आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

7 दिवसांवर होते लग्न, नवरदेवाने ठेवल्या \'अशा\' अटी की भरचौकात तरुणीने चपलेने केली धुलाई

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवरदेवाने हुंडा मागितल्याने मुलीने त्याला भरचौकात चपलेने चोप दिला. - Divya Marathi
नवरदेवाने हुंडा मागितल्याने मुलीने त्याला भरचौकात चपलेने चोप दिला.

इंदूर -  लग्नाची सर्व तयारी झाली होती, 28 नोव्हेंबरला होणाऱ्या लग्नासाठी सगळे उत्सुक होते तसेच व्यग्र होते. ठीक 7 दिवसांपूर्वी वरपक्षाने लग्नाला नकार द्यायला सुरुवात केली. लग्नासाठी त्यांनी अटी ठेवायला सुरुवात केली. याआधीही मुलाने मुलीशी लग्नाला नकार दिला होता, कारण नवरी मुलगी मोबाइलवर त्याच्याशी बोलत नव्हती.

 

असे आहे प्रकरण...
- लग्नाच्या 7 दिवसांपूर्वीच नवरदेवाने आपल्या अटी स्टॅम्प पेपरवर लिहून त्यावर नियोजित वधूची सही घेण्यासाठी तिला बोलावले. मुलीने सही तर केली नाही, पण नवरदेवाला मात्र चपलेने मारहाण केली.
- मारहाणीमुळे मुलाच्या चेहऱ्यावर वळ उमटले होते. पोलिसांनी मुलीच्या तक्रारीवरून हुंड्याची मागणी केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
- मारहाणीनंतर मुलगी म्हणाली, हुंड्याच्या लोभापाई त्याला मी केलेली मारहाणही कमीच आहे, त्याने पुन्हा कुणालाही हुंडा मागण्याची हिंमत करू नये म्हणून मी हे पाऊल उचलले.

- तरुणी सरकारी शाळेत सहायक शिक्षिका आहे. खरगोनला राहणाऱ्या भूपेंद्रशी तिचे लग्न ठरले होते.
- सोमवारी याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी दोघांमध्ये समझौता केला. दोघांचे कुटुंबीय यानंतर पुन्हा लग्नासाठी राजी झाले होते.
- मंगळवारी 21 नोव्हेंबरला भूपेंद्र त्याच्या आईवडिलांसह तसेच इतर कुटुंबीयांसह कोर्टात गेला. तेथे स्टॅम्प पेपरवर त्याने अटी लिहिल्या. आणि हे स्टॅम्प पेपर घेऊन तरुणीची स्वाक्षरी घ्यायला गेला.
- यानंतर कोर्टासमोरील झेरॉक्स दुकानावर त्याने नियोजित वधू तरुणीला बोलावले. तरुणीने अटी वाचल्या आणि चप्पल काढून मुलाला मारहाण सुरू केली.
- तिने तब्बल 20 मिनिटे मुलाला मारहाण केली. तरुणीच्या तक्रारीवरून भूपेंद्रविरुद्ध कलम 498 नुसार गुन्हा दाखल झाला आहे.


या होत्या स्टॅम्प पेपरवरील अटी...
> लग्नानंतर नोकरीतून सुटी घेऊन सासरी राहावे लागेल. 
> घरच्यांशी किंवा नवऱ्याशी भांडण झाल्यास पोलिस- कोर्टात जाणार नाही.
> लग्नासाठी भूपेंद्र किंवा त्याच्या कुटुंबीयांकडून हुंड्याची मागणी झालेली नाही.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, या घटनेचे आणखी PHOTOS... शेवटच्या स्लाइडवर पाहा व्हिडिओ

बातम्या आणखी आहेत...