आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 79 Years BJP Learder Traped In Sexual Exploitation In MP

मध्‍य प्रदेशात लैंगिक शोषण प्रकरणी भाजपाचे 79 वर्षांचे मंत्री अडकले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळ - मध्य प्रदेशचे वित्तमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते राघवजी भाई यांच्यावर त्यांच्याच घरगड्याने लैंगिक शोषणचा आरोप केला आहे. यानंतर मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या निर्देशानंतर 79 वर्षांच्या राघवजी यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.


राघवजी भाई यांच्या 28 वर्षीय नोकराने आरोपांच्या पुष्टीसाठी एक सीडीही पोलिसांकडे सादर केली आहे. सरकारी नोकरी मिळवून देण्याच्या आमिषाने गेल्या तीन वर्षांपासून राघवजी आपले लैंगिक शोषण करत असल्याचे पीडित युवकाने म्हटले आहे.


गेल्या 10 वर्षांपासून वित्तमंत्री असलेले राघवजी व त्यांची पत्नी हीराबेन यांनी शोषणाचे आरोप फेटाळले आहेत. दरम्यान ,मंत्र्यांच्या चपराशाने आरोपांच्या समर्थनार्थ शपथपत्र सादर केले आहे. मोबाइलद्वारे त्याने मंत्र्याचा व्हिडिओही रेकॉर्ड केला आहे.


याबाबत राघवजी म्हणाले की, त्या तरुणाबद्दल माझ्या मनात सहानुभूती असल्यामुळेच तो अनेक वर्षांपासून आमच्यासोबत राहत होता. त्याने कशामुळे हे आरोप केले आहेत हे माहित नाही. हे बहुतेक राजकीय कारस्थान असावे. हा तरुण अत्यंत गरीब असल्यामुळे त्याच्यावर अब्रुनुकसानीचा दावा करणार नाही, असेही त्यांनी सांगितले.