आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अन्न निरीक्षकाकडे सापडले ८० कोटी रुपयांचे घबाड!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंदूर - राज्य लोकायुक्त पोलिसांनी रविवारी खंडवा येथील अन्न निरीक्षक अश्विनी नायक यांच्या इंदूरमधील निवासस्थानी छापा टाकला. छाप्यात तब्बल ८० कोटी रुपयांची संपत्ती सापडली. फ्लॅटमध्ये नगदी १८ लाख रुपये मिळाले. त्यांच्या नावावर राऊ येथे ५० कोटी रुपये किमतीची इमारत, इंद्रप्रस्थ टॉवरमध्ये मोठे ऑफिस, अर्धा किलो सोन्याचे दागिने आणि चांदी, दोन जिम, तीन स्विफ्ट कार, राऊ येथे गॅस एजन्सी, दोन हजार चौरस फुटाचे दोन फ्लॅट अशी संपत्ती आहे. उत्पन्नाच्या ज्ञात स्रोतांपेक्षा जास्त संपत्ती बाळगल्याच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली.