आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 80 Years Old Akbar Patel Give Standard Fifth Examination

जिद्द: हुशार आणि आज्ञाधारक असलेले 80 वर्षांचे अकबर पटेल देणार पाचवीची परीक्षा...!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उज्जैन - मध्य प्रदेशातील बडनगर गावातील कंजडमोमीनपुरा या गावातील प्राथमिक शाळेत एकूण 65 विद्यार्थी शिकतात. शाळेच्या इयत्ता पाचवीतील विद्यार्थ्यांची संख्या 15 एवढी आहे. पण या शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये एक विद्यार्थी खूप वेगळा आहे. अकबर पटेल नावाचा हा विद्यार्थी तब्बल 80 वर्षांचा आहे. अभ्यासात लक्ष देणारा, हुशार आणि आज्ञाधारक असा हा विद्यार्थी यंदा पाचवीची परीक्षा देणार आहे.
नातवांच्या वयाचे वर्गमित्र : 80 वर्षांच्या अकबर पटेल यांनी तीन वर्षांपूर्वी या शाळेत प्रवेश घेतला. दुसरी, तिसरी आणि चौथी इयत्ता पास केल्यानंतर या वर्षी त्यांनी पाचवीत प्रवेश घेतला आहे. इतर विद्यार्थ्यांप्रमाणे दररोज दप्तरात वह्या-पुस्तके घेऊन शाळेत येतात. पाच वाजेपर्यंत मन लावून अभ्यास करतात. आपल्या नातवांच्या वयाच्या मुलांसोबत शिकताना, अभ्यास करताना त्यांना जराही संकोच वाटत नाही.
शिकण्याचा उत्साह अन् जिद्द : वर्गशिक्षिका साधना चौधरी सांगतात की, ‘अकबर भार्इंमध्ये पहिल्या दिवसापासून शिकण्याची जिद्द दिसली. रोज दुपारी शाळेच्या वेळात ते इतर मुलांसोबत दप्तर घेऊन शाळेत येतात आणि सतरंजीवर बसतात. ते होतकरु विद्यार्थी असून मलाही त्यांना शिकवताना आनंद मिळतो. ’
अनुभवांची शिदोरी : 80 वर्षांचे अकबर भाई आपल्या नातवांच्या वयाच्या विद्यार्थ्यांसोबत शिक्षण घेत असले तरी ते या लहान मुलांमध्ये मिळून मिसळून वागतात. आपल्यातील या वयोवृद्ध वर्गमित्राकडून शाळेतील इतर विद्यार्थ्यांना खूप काही शिकता येते. फावल्या वेळेत अकबर भाई मुालंना त्यांच्या बालपणी घडलेल्या तसेच आयुष्यात आलेल्या अनुभवांनुसार वेगवेगळ्या गोष्टी सांगतात. त्यामुळे मुलांशीही त्यांची गट्टी जमली आहे.
नातवांसोबत शिक्षण : अकबर यांना पाच मुले असून ते सर्वच्या सर्व निरक्षर आहेत.त्यापैकी चार जणांचा निकाह झाला आहे.त्यांना दोन नातू असून हे नातूही याच शाळेत तिसरी,चौथी इयत्तेत शिकतात.ज्या अडीच एकर जागेवर ही शाळा आहे ती जागाही अकबर यांचीच आहे.ही जागा त्यांनी सहा वर्षांपूर्वी शाळेसाठी दान केली होती.
कौतुकास्पद
कंजड येथील शाळेत जाऊन जेष्ठ नागरिक विद्यार्थी अकबर यांची अक्षरओळख परिक्षा घेतली होती. गावातून निरक्षरतेचे उच्चटन करण्यासाठी पटेल यांचा पुढाकार कौतुकास्पद आहे.
मनोज त्रिवेदी, जिल्हा प्रकल्प अधिकारी