आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

९१ व्या वर्षी कॉम्प्युटर शिकण्याची इच्छाशक्ती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ - वयाचे शतक गाठण्यासाठी केवळ ९ वर्षे कमी, परंतु या वयातही कोटा येथील रमेश चंद गर्ग यांचा उत्साह थक्क करणारा होता. त्यांच्यात शिकण्याची इच्छाशक्ती होती. तोही संगणकासारखा कठीण विषय. ‘दैनिक भास्कर’ समूहातर्फे आयोजिक संगणक प्रशिक्षणात ते सहभागी झाले. यात ते कॉम्प्युटर सुरू करण्यापासून पत्र टायपिंग, एक्सल शिट तयार करणे शिकले. रमेश गर्ग यांच्याप्रमाणेच अनेक ज्येष्ठ नागरिक, महिला भास्कर समूहाच्या संगणक प्रशिक्षणात कॉम्प्युटर शिकण्याची इच्छाशक्ती दाखवत जिद्द दाखवून देत आहेत.

दैनिक भास्कर समूहातर्फे दहा राज्यांत ३४ शहरांत हे नि:शुल्क प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. तीन महिन्यांपर्यंत चालणा-या या प्रशिक्षणात १२,००० पेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिक, महिलांना प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट आहे. या प्रशिक्षणची दोन सत्रे पार पडली असून पहिल्या व दुस-या बॅचमध्ये मिळून ३,४५० पेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिक, महिलांनी संगणक प्रशिक्षण घेतले आहे. यापैकी बहुतांश जण संगणकाबाबत पूर्णपणे अनभिज्ञ होते. कुणी वाढत्या वयामुळे संकोच करत होते तर कुणाला कौटुंबिक व्यापातून वेळ मिळत नव्हता. संगणक प्रशिक्षण कार्यक्रम हे एक असे माध्यम बनला की त्यांनी केवळ संगणक शिकले नाही तर नवा आत्मविश्वासही परत मिळवला. अनेकांना रोजगार संधी उपलब्ध झाल्या.