आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भररस्त्यावरून मुलीला नेले उचलून, गँगरेप करून फेकले जंगलात, एका आरोपीनेच केला पोलिसांना फोन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

छतरपूर (एमपी) - 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला 2 तरुण शनिवारी दुपारी बळजबरी बाइकवर बसवून घेऊन गेले. यानंतर त्यांनी अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केला आणि जंगलातील एका पुलाजवळ फेकून दिले. यानंतर आरोपींपैकीच एकाने डायल 100 ला कॉल करून घटनास्थळी बोलावले आणि स्थानिक रुग्णालयात दाखल केले. तेथून मुलीला हलवलण्यात आल्यानंतर सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. दरम्यान, आरोपी तरुणही सोबतच होता. तेथे अल्पवयीन मुलीला शुद्ध आल्यानंतर मात्र तो पळून गेला.

 

दुपारी 12 वाजता कपडे शिवायला देण्यासाठी जात होती तरुणी
मिळालेल्या माहितीनुसार, छतरपूरमधील उदयपुरा गावाची रहिवासी 15 वर्षीय मुलगी शुक्रवारी दुपारी 12 वाजता कपडे शिवण्यासाठी जवळच्याच गल्लीत जात होती. यादरम्यान, वाटेत बिजावरचे दोन तरुण बाइकवर स्वार होऊन आले आणि तिला बळजबरी बाइकवर उचलून घेऊन गेले. यानंतर या तरुणांनी तिच्या सामूहिक बलात्कार केला. तिची अवस्था गंभीर झाल्यानंतर तिला पठारच्या जंगलात एका पुलाजवळ फेकून दिले. डोक्याला जबर दुखापत झाल्याने अल्पवयीन मुलीची प्रकृती गंभीर झाली होती, म्हणून एका आरोपीने डायल 100 ला कॉल करून घटनास्थळी बोलावले. पोलिसांनी तेथे धाव घेतल्यानंतर पीडितेला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु तेथेही तिची प्रकृती ढासळल्याने तिला जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले. जिल्हा रुग्णालयात एका दिवस अॅडमिट राहिल्यानंतर शनिवारी संध्याकाळी पीडितेला शुद्ध आली. शुद्धीवर येताच पीडितेने कुटुंबीयांना पूर्ण घटनाक्रमाची माहिती दिली. सर्व हकिगत कळताच तिचे वडील व भाऊ पोलिस स्टेशनमध्ये पोहोचले आणि त्यांनी आरोपींविरुद्ध कारवाई करण्यासाठी अर्ज दिला. पोलिस स्टेशन प्रभारी एस. एस. मिश्रा यांनी बिजावर रुग्णालयाद्वारे देण्यात आलेल्या सूचना आणि वडिलांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारावर पीडितेचे जबाब नोंदवण्यासाठी एएसआयला जिल्हा रुग्णालयात पाठवले. जर अल्पवयीन पीडितेने बलात्कार झाल्याचा जबाब दिला, तर गुन्हा दाखल करून कारवाई केली जाईल.

 

वाटसरूंनी पाहिले 4 तरुणांना

पीड़ितेचे कुटुंबीय म्हणाले की, गावातील लोकांनी माहिती दिली की, शुक्रवारी दुपारी तिला 4 तरुणांसोबत पाहण्यात आले. यादरम्यान, त्या तरुणांपैकी एक जण तिच्याशी छेडछाड करत होता. परंतु वाटसरूंना वाटले प्रेमप्रकरण असावे, म्हणून त्यांनी दखल दिली नाही.


शुद्धीवर येताच आरोपी गायब
पीडितेचे कुटुंबीय म्हणाले की, बलात्कार करणाऱ्या एका आरोपीने पोलिसांना सूचना दिली की, या मुलीचा अॅक्सिडेंट होऊन ती जखमी झाली आहे. सूचना मिळताच डायल 100 पोलिस घटनास्थळी पोहोचले व तिला स्थानिक रुग्णालयात दाखल केले. तेथे ती शुद्धीवर न आल्याने तिला जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले. या पूर्ण घटनाक्रमादरम्यान आरोपी सोबत राहिला आणि कुटुंबीयांची मदत करत राहिला. शनिवारी संध्याकाळी उशिरा अल्पवयीन मुलीला शुद्ध येताच काही वेळानंतर तो तेथून गायब झाला. शुद्धीवर आल्यावर पीडितेने कुटुंबीयांना काहीच सांगितले नाही. परंतु कुटुंबीयांनी विश्वासात घेऊन समजावल्यावर तिने आपल्यासोबत झालेल्या घटनेची माहिती दिली. 

 

बातम्या आणखी आहेत...