आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 30 Year Old Maid Raped By Driver And Cook At BJP MLA Residence In Bhopal Latest Crime News

भाजप आमदाराच्या बंगल्यातील मोलकरणीवर नोकरांनी केला बलात्कार, चोरीच्या गुन्ह्यात अडवकण्याची धमकी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळ (मध्य प्रदेश) - 74 बंगलामध्ये राहणाऱ्या भाजपच्या एका आमदाराच्या घरात काम करणाऱ्या मोलकरणीवर बलात्काराचे प्रकरण समोर आले आहे. तक्रार मिळाल्यावर शुक्रवारी रात्री टीटीनगर पोलिसांनी दोन आरोपींविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

 

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भिंड जिल्ह्यातील मेहगाव मतदारसंघाचे भाजप आमदार मुकेश चौधरी यांच्या भोपाळमधील 74 बंगला स्थित निवासातील सर्व्हंट क्वार्टरमध्ये राहणारी मोलकरणीने तेथे काम करणाऱ्या ड्रायव्हर आण स्वयंपाक्यावर बलात्काराचा आरोप केला. पीडितेने आमदाराचा ड्रायव्हर आणि स्वयंपाक्यावर बलात्काराचे आरोप केले. टीटीनगर पोलिसांनी प्रकरण दाखल केले आहे. आरोपींना अद्याप अटक झालेली नाही.

 

एएसपी धर्मवीर सिंह म्हणाले, 30 वर्षीय पीडिता आमदाराच्या बंगल्यावर साफसफाईचे काम करते. ती तेथेच असलेल्या सर्व्हंट क्वार्टरमध्ये राहते. त्याच घरातील इतर सर्व्हंट क्वार्टरमध्ये नोकर राहतात. पीडि़तेने पोलिसांना सांगितले की, आरोपींनी तिला चोरीच्या केसमध्ये अडकवण्याची धमकी देऊन बलात्कार केला. आमदाराच्या ड्रायव्हरनेही तिला चोरीच्या केसमध्ये अडकवण्याची भीती घालून रेप केला. हे नेहमी होऊ लागल्याने त्रस्त होऊन पीडितेने शुक्रवारी रात्री पोलिस स्टेशनमध्ये पोहोचून गुन्हा दाखल केला. एएसपींनी सांगितले की, पीडितेविरुद्ध यापूर्वी एका आरोपी नोकराने बंगल्यात चोरी केल्याची तक्रार दाखल केलेली होती. त्या प्रकरणाचाही तपास अजून सुरू आहे. 

   

बातम्या आणखी आहेत...