आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • पाशवी कृत्यामुळे 4 महिन्यांचे बाळ रडले तेव्हा तोंड दाबले; गप्प झाली नाही म्हणून नराधमाने पायऱ्यांवर आदळले 4 Month Old Girl Molestation After Murder In Rajwada Indore

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाशवी कृत्यामुळे 4 महिन्यांचे बाळ रडले तेव्हा तोंड दाबले; गप्प झाली नाही म्हणून पायऱ्यांवर आदळले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंदूर - 4 महिन्यांच्या बालिकेवरील बलात्कार आणि हत्येचा आरोपी नवीन गड़के याला शनिवारी कोर्टात हजर करण्यात आले. कोर्टाने त्याला दोन दिवसांसाठी पोलिस रिमांडवर सोपवले आहे. घटनेच्या नंतर आरोपी धारला पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. त्याच्यावर शहर पोलिसांतही 2 गुन्हे दाखल आहेत. सन 2004 मध्ये त्याच्याकडे चाकू आढळला होता. तेव्हा पोलिसांनी त्याच्यावर आर्म्स अॅक्टअंतर्गत कारवाई केली होती. सन 2014 मध्ये मारहाणीची केसही दाखल करण्यात आलेली आहे. 

- पोलिसांनी जेव्हा आरोपीला पकडले तेव्हा मुलीच्या आईला विश्वासच बसला नाही की, त्याने हे कृत्य केले आहे. जेव्हा चिमुकलीच्या रक्ताने माखलेले आरोपी नवीनचे कपडे मिळाले आणि त्याने गुन्हा कबूल केला तेव्हा बाळाची आई आक्रोशित झाली.
- तिने पोलिस स्टेशनमध्येच त्याला थापडा मारायला सुरुवात केली. ती त्याला फाशी देण्याची मागणी करत होती. दुसरीकडे पोलिसांनी जेव्हा आरोपीची चौकशी केली तेव्हा तो दुसरीच कहाणी ऐकवू लागला.
- पोलिस सूत्रांनुसार, जेव्हा त्याच्या हाताची बोटे बुटांखाली दाबली आणि कडक चौकशी केली तेव्हा त्याने कृत्य कबूल केले. 

 

घटनेनंतर लपून बसला होता, नंतर बदलले होते कपडे
- चौकशीत कळले की, तो घटनेनंतर लपून बसलेला होता. त्याने मुलीच्या रक्ताने माखलेले आपले कपडेही बदलले आणि कुणाला सापडू नयेत म्हणून ते कुठेतरी दडवून ठेवले. 
- पोलिसांना त्याच्याबाबत माहिती मिळताच त्यांनी 15 ते 20 ठिकाणी छापेमारी केली. 5 मिनिटेही पोलिसांना उशीर झाला असता तर आरोपी फरार झाला असता. तो येथून धार आणि तिथून रेल्वेने दुसऱ्या राज्यात पळून गेला असता.

 

विकृत नराधम: स्वत:वर ब्लेडने केल्या 500 जखमा

- दुधपित्या तान्ह्या मुलीवर पाशवी कृत्य केल्यानंतर तिची हत्या करणारा विकृत नराधम हिंस्र स्वभावाचा आहे. बाळाला उचलून तो श्रीनाथ पॅलेसच्या बेसमेंटमध्ये घेऊन गेला. येथे पायऱ्यांवर बाळावर त्याने पाशवी कृत्य केले.
- 4 महिन्यांची मुलगी जेव्हा रडू लागली तेव्हा पकडली जाण्याच्या भीतीने त्याने मुलीचे तोंड दाबले आणि वरतून फेकून दिले. आरोपी व्यसनी आहे. नशा केल्यानंतर तो स्वत:च्या शरीरावर ब्लेडने घाव करायचा. 
- असे 500 हून जास्त निशाण त्याच्या शरीरावर आहेत. आपल्या दोन मुलींवरही त्याची वाईट नजर होती. यामुळे पत्नी त्याला सोबत ठेवत नव्हती.

 

चिमुरडी: शस्त्राने वार केल्यासारखी पीडा सहन केली
- शिशुरोग तज्ज्ञानुसार, 4 महिन्यांचे कोणतेही बाळ रडणे, दूध पिणे आणि आईला ओळखणे शिकत असते. या वयात आंतरिक विकासही झालेला नसतो.
- यामुळे चिमुकलीवर हे सर्व करणे म्हणजे अनेक धारदार शस्त्रांनी तिच्यावर वार करण्यासारखे आहे. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्येही चिमुरडीचे तोंड दाबल्याचे समोर आले आहे.
- चाचा नेहरू रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. हेमंत जैन म्हणतात की, या घटनेत आरोपीकडून चिमुरडीला भयंकर यातना देण्यात आल्या असतील.


इंदूर: एवढे पोलिस नसते तर जीवच घेतला असता आरोपीचा
- आरोपी नवीनला शनिवारी संध्याकाळी कोर्टात हजर करण्यात आले तेव्हा आक्रोशित वकील, महिला वकील आणि लोकांनी त्याला बेदम मारहाण केली.
- महिला आणि महिला वकिलांनी त्याला चपला-बुटांनी बेदम मारहाण केली. एक महिला वकील तर बेसबॉलचा स्लॅगर घेऊन आल्या होत्या. शहरभरात याविरोधी उग्र प्रदर्शन झाले.
- काँग्रेस-भाजपसहित डझनभराहून जास्त संघटनांनी आरोपीला तत्काळ फाशी देण्याची मागणी केली. सर्वांनी म्हटले की, या घटनेने इंदूरला काळिमा फासला आहे.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, आरोपीला कोर्ट परिसरातच वकिलांकडून बेदम मारहाण होतानाचा फोटो...

बातम्या आणखी आहेत...