आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

GF च्या वडिलांनी केले Challenge; खरे प्रेम असेल तर घरी ये, मरून दाखव! BJP नेत्याची आत्महत्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळ - भाजप युवा मोर्चा नेता अतुल लोखंडेने (30) मंगळवारी रात्री पिस्टलने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. आपल्या घरासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या मुलीवर तो जिवापाड प्रेम करायचा. तो लग्नाचा प्रस्ताव घेऊन प्रेयसीच्या घरी पोहोचला होता. परंतु, तिच्या वडिलांनी नकार दिल्याने त्याने हे टोकाने पाऊल उचलले आहे. आत्महत्येच्या अवघ्या 10 मिनिटांपूर्वी त्याने फेसबूकवर पोस्ट लिहिली. तसेच गेल्या 13 वर्षांपासून या तरुणीशी अफेअर सुरू असल्याचा दावा केला. त्याची प्रेयसी (27) एका बँकेत प्रोबेशनरी ऑफिसर आहे. 

 

पोलिस म्हणाले, 

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री सुमारे 9 वाजेच्या सुमारास अतुल आपल्या प्रेयसीच्या घरी पोहोचला होता. दार तरुणीच्या वडिलांनी उघडले होते. अतुलने त्यांच्याकडे लग्नाचा प्रस्ताव ठेवला. त्यास तरुणीच्या वडिलांनी स्पष्ट नकार दिला. यावर नाराज अतुलने आपल्या खिशात ठेवलेली पिस्तुल काढली आणि घरासमोरच स्वतःच्या कानाखाली ठेवून शूट केले. फायरिंगचा आवाज ऐकूण लोक गोळा झाला. तशाच अवस्थेत अतुलला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, रात्री उशीरा डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. 

 

मरताना म्हणाला, मेलो तर पुढच्या 7 जन्मात लग्न करेन
आत्महत्येच्या अवघ्या काही मिनिटांपूर्वी अतुलने फेसबूक पोस्ट लिहिली. त्यामध्ये अतुल म्हणाला, ''तिच्या वडिलांनी सध्याकाळी सांगितले होते, की आपल्या प्रेयसीवर खरोखर प्रेम असेल तर तिच्यासाठी मरून दाखव. वाचलास तर नक्की दोघांचा विवाह लावून देईन. मेलास तर पुढच्या 7 जन्मात लग्न करून घेशील. मी रश्मीच्या घरी आहे. मला येथूनच घेऊन जा. जीवंत वाचलो तर स्वतः येईन. तिला शब्द दिला होता. एक शब्द पाळू शकलो नाही. दुसरा शब्द देतो, की तुझ्याविना जगू शकत नाही. त्यामुळे मी जातोय. सगळे हेच म्हणतील की पोरीच्या भानगडीत गेला. एकदा घरच्यांचा सुद्धा विचार केला नाही. सगळ्या गोष्टींचा विचार करूनच हा निर्णय घेतला आहे. याशिवाय दुसरे काहीच दिसत नाही. खूप प्रयत्न केले तुला विसरण्याचे. परंतु, परक्यांना विसरले जाते. आपल्या लोकांना विसरताच येत नाही.''


आईसाठी लिहिले...
अतुलने फेसबूकवर आपल्या आईसाठी लिहिले, ''तिला (प्रेयसी) ला काहीच दोष देऊ नकोस. चूक माझीच होती. सर्व काही माझ्यामुळेच बिघडले आहे. 13 वर्षांपासून मी तिच्यासोबत राहण्याचे स्वप्न पाहत होतो तेही पूर्ण करू शकलो नाही. तू पण (प्रेयसी) आपल्या 13 वर्षांच्या नात्याला कशी काय विसरली. तुझ्या पप्पांसमोर घाबरलीच कशी? एकदा धाडस दाखवला असतास तर आयुष्यात काही और घडले असते. मम्मी सगळेच म्हणतात, की 7 जन्म होतात. पुढे जन्म झाला तर तुझाच मुलगा होऊन जन्माला येईन. तुझ्यासारखी आई या जगात दुसरी नाही.''

बातम्या आणखी आहेत...