आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Bhopal Video : Psycho Rohit Beaten In Front Of Police By Mob Victim Said, I Want Him To Be Hanged

माथेफिरूची पोलिसांनी काढली धिंड, महिलांनी चपलांनी बदडले, पीडित मॉडेल म्हणाली- त्याला फासावर लटकवा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळ - तब्बल 12 तास मॉडेलला बंधक बनवल्याच्या प्रकरणात पोलिसांनी आरोपी रोहितला घटनास्थळी घेऊन गेले. यानंतर त्याला पोलिस कोर्टात सादर करतील. घटनास्थळी आरोपीला नेल्यावर तेथे एक महिला पोहोचली आणि तिने पोलिसांसमोरच त्याला चापटा मारायला सुरुवात केले. मग इतर मुलींनी बुटा-चपलांनी त्याची चांगलीच धुलाई केली. यादरम्यान, आरोपी रोहितच्या चेहऱ्यावर कोणताही पश्चात्ताप नव्हता. तो म्हणाला की, तो तिच्यावर एकतर्फी प्रेम करत नव्हता, तिला माझ्याशी लग्न करायचे आहे. परंतु तिच्या आईवडिलांच्या दबावात ती लग्नाला नकार देत आहे.


काय म्हणाला माथेफिरू रोहित?
रोहितने एका वाहिनीला सांगितले की, ती आणि मी दोघेही एकमेकांवर प्रेम करतो. माझ्याकडे तिच्या चॅटिंगचे सर्व पुरावे आहेत. विचार करा- तिचे घर सगळीकडून बंद होते. मग मी आत कसा गेलो. सकाळी तिच्या आईवडिलांना कळले की मी घरात आहे, तेव्हा त्यांनी मोठा गोंधळ सुरू केला. तो मोठमोठ्याने ओरडू लागले. पोलिस वगैरे बोलावले. मी भ्यायलो. मला आता खूप मार बसेल म्हणून मी हे सर्व केले. ती आता जरी मला फाशी द्या म्हणत असली तरी ती तिच्या आईवडिलांच्या दबावात तसे म्हणत आहे. तिला माझ्याशी लग्न करायचे आहे. तिची इच्छा असेल तर फासावरही चढायला तयार आहे.

 

काय म्हणाली पीडिता?
पहिल्यांदा पीडिता समोर येऊन म्हणाली की, त्याला फाशीच झाली पाहिजे. त्याने मला बांधून ठेवले होते. रोहित म्हणत होता की, जर लग्न केले नाहीस, तर मी तुझ्यावर गोळी झाडेन. मग स्वत:ही मरून जाईन. मी जीव वाचवण्यासाठी लग्नासाठी होकार भरला होता. त्याने चाकूच्या धाकाने माझ्याकडून स्टॅम्प पेपरवर साइन घेतली. जर मी त्याला हो म्हणाले नसते तर... तर आज जिवंत नसते. यापूर्वी 28 फेब्रुवारीलाही तो पिस्तूल घेऊन माझ्या घरात घुसला होता. तो सारखा लग्नासाठी दबाव टाकत होता. मी त्याच्यापासून दूर होण्याचा प्रयत्न केला, पण तो मला त्रास देत होता.

मॉडेलने सांगितले की, जेव्हा त्याने बांधून ठेवले होते, मला बेदम मारहाण केली. मी शुद्धीत होते, पण मला चकरा येत होत्या. तो सारखा म्हणत होता की, बघ, बाहेर किती मीडिया आला आहे. आता मी फेमस होईल. रोहितपासून माझ्या जिवाला कायम धोका आहे. जर तो तुरुंगातून सुटून आला, तर पुन्हा माझ्या कुटुंबाचे आणि माझे काही बरे-वाईट करू शकतो. त्याला फाशीच झाली पाहिजे.


5 महिन्यांपासून त्रास देत होता रोहित, पोलिसांनी काहीच केले नाही
माझ्या मुलीशी रोहितची 3 वर्षांपूर्वी मुंबईत भेट झाली होती. आता रोहित तिला त्रास देत आहे. 28 फेब्रुवारीला तो मुलीचा पाठलाग करत आमच्या कॉलनीपर्यंत आल्यावर त्या दोघांच्या मैत्रीबाबत कळले. त्याला 4-5 दिवसांपूर्वी कॉलनीतील लोकांनी रेकी करताना पाहिले होते. मी दार उघडल्यावर तो म्हणाला, मी तुमच्या मुलीचा फ्रेंड आहे. आत आला आणि मुलीला छतावर चलण्यासाठी सांगू लागला. मी आणि छोटी मुलगीही सोबत गेलो. येथे त्याने आम्हाला गावठी कट्टा दाखवून बंधक बनवले. 4 तास आम्ही तेथेच अडकून होतो. टॉयलेट आल्यावर म्हणायचा, येथेच करा. यानंतर दोन्ही मुलींना लिफ्टच्या मार्गाने ग्राउंड फ्लोरवर घेऊन गेला. नंतर कॉलनीच्या गेटबाहेर गेला. दुसऱ्याच दिवशी आम्ही मिसरोद पोलिस स्टेशनमध्ये जाऊन त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. पूर्ण घटनाक्रम सांगितला, परंतु पोलिसांनी फक्त घरात घुसून मारहाण आणि शिवीगाळ केल्याच्या कलमांमध्ये केस दाखल केली. दोन दिवसांतच त्याला जामीन मिळाला. तेव्हापासूनच तो चिडलेला होता. जर तेव्हाच रोहितविरुद्ध पोलिसांनी कडक कारवाई केली असती, तर आज माझ्या मुलीची ही दशा झाली नसती. 
- पीडितेची आई


माथेफिरूची सतत 12 तास काढली समजूत- एसपी
मी रोहितशी सातत्याने बोलत होतो. तो 5-6 वेळा रूमबाहेर यायला तयार झाला, परंतु काही मिनिटांनीच परत निर्णय बदलत होता. मी म्हणालो, मला एकदा एकट्याने आत येऊ दे, परंतु ऐकले नाही. मग मी त्याला हायड्रोलिकवर चढून बोलण्यासाठी विचारले. तो तयार झाला. डोळ्याला डोळा भिडवून त्याच्याशी बोललो. समोरासमोर बोलल्याने तो थोडा शांत झाला. आधी म्हणाला की, विभाचे डोके आणि पाय दुखत आहेत. मला तिचे पाय दाबावे लागताहेत. मग म्हणाला, मला वडिलांशी बोलायचे आहे, मग आपल्या फोनवरून कॉल केला. स्पीकरवर त्याचे वडिलांशी बोलणे करण्यात आले. ते म्हणाले, बेटा आता उतरून जा, का सर्वांना त्रास देत आहेस. तेव्हा कुठे रूमबाहेर यायला तयार झाला. 
- राहुल लोढा, एसपी साऊथ

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, माथेफिरूला मारहाणीचा Video व आणखी photos...

 

 

बातम्या आणखी आहेत...