आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मूकबधिर तरुणीने गळफास बनवून केला व्हिडिओ कॉल, बाप अन् पतीनेच केले पाशवी अत्याचार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंदूर - मूकबधिर संस्थान इंदूरच्या मोनिका पुरोहित यांना एका 25 वर्षीय मूकबधिर तरुणीने कॉल करून आपली पीडा सांगितली. तिने आपल्या बापावर आरोप केला की, तो लहानपणापासून तिचे लैंगिक शोषण करत होता. यामुळे ती त्रस्त झाली आणि तिने काही परिचितांची मदत घेतली असता 10 मार्चला तिचे लग्न लावून देण्यात आले. पतीही पशूच निघाला. तोही तिच्यावर पाशवी अत्याचार करू लागला. शेवटी त्रस्त होऊन तिने जीव देण्याचा निश्चय केला होता. तिला न्याय पाहिजे होता. किमान आपल्या मृत्यूनंतर तरी न्याय मिळावा अशी तिला अपेक्षा होती, यामुळेच तिने समुपदेशकांशी संपर्क साधला. संचालकांनी मूकबधिर शिक्षिकेच्या मदतीने तिची काही मिनिटे काउन्सेलिंग केली. दुसरीकडे राजस्थान पोलिसांच्या मदतीने तिचा जीव वाचवण्यात आला आहे.

 

इशाऱ्यांमध्ये बोलली तरुणी- माझे म्हणणे ऐका, नाहीतर फाशी घेऊन जीव देईन
- म.प्र. पोलिसांच्या मूक-बधिर संस्थेचे संचालक ज्ञानेंद्र पुरोहित एका कामानिमित्त मुंबईत होते. शुक्रवारी सकाळी 11 वाजता त्यांच्या मोबाइलवर राजस्थानच्या हनुमानगडच्या एका मूकबधिर तरुणीचा व्हिडिओ कॉल आला. यात ती म्हणाली की, तिचे म्हणणे ऐकले नाही, तर ती फाशी घेऊन जीव देईल.   
- पुरोहित यांनी लगेच तिचे म्हणणे ऐकले. तरुणीने खोलीतील पंख्याला ओढणी बांधून गळफास तयार केला होता. पुरोहित यांनी आपल्या साइन लँग्वेज एक्स्पर्ट काउन्सेलर तस्लीम शेख यांना तरुणीशी बोलायला लावले. तस्लीम यांनी तिचे पूर्ण म्हणणे ऐकले आणि तिची सर्व मदत करण्याचे आश्वासन देऊन फाशी घेऊ नकोस म्हणाल्या.
- यादरम्यान पुरोहित यांनी तिचा नंबर हनुमानगड एसपींना दिला आणि तिच्याबाबत सांगितले. महिलेला ट्रेस करून पोलिस तिच्या घराच्या लोकेशनवर पोहोचले.

 

तरुणीने व्हिडिओ कॉलमध्ये जेव्हा गळफास दाखवला, तेव्हा सर्व भयचकित झाले
- यादरम्यान पुरोहित यांनी मूक-बधिर संस्थान इंदूरमध्ये त्यांची पत्नी मोनिका पुरोहित यांनाही तिचा नंबर दिला. मोनिका यांनीही तिला व्हिडिओ कॉल करून साइन लँग्वेजमध्ये तिच्या बोलून तिचे दु:ख ऐकले.
- तरुणीने जेव्हा व्हिडिओ कॉलदरम्यान त्यांना गळफास दाखवला तेव्हा सर्व भयचकित झाले. ताबडतोब साइन लँग्वेज एक्स्पर्ट काउन्सेलर तस्लीम शेख यांना तरुणीशी बोलायला लावले. वेळेवर त्याच व्हिडिओ कॉलमध्ये समुपदेशन झाल्याने तिचा जीव वाचला.
- तरुणीला राजस्थान पोलिसांच्या महिला सेलमध्ये सुरक्षित ठेवण्यात आले आहे.

 

तरुणी आणि समुपदेशकांमध्ये इशाऱ्यांमध्ये झालेली बातचीत...

 

तरुणी - माझ्याकडे कोणताही पर्याय नाही. मला आत्महत्याच करावी लागेल. तुम्ही माझी कशी मदत करू शकता?

काउन्सेलर - आत्महत्या करणे चुकीचे आहे. तू असे करू नकोस. आम्ही तुझ्यासोबत आहोत, तुला न्याय मिळवून देऊ.


तरुणी - मला आतापर्यंत कुठलाही न्याय मिळाला नाही. माझ्यासोबत खूप वाईट झालेल आहे. प्लीज लवकर माझी मदत करा, नाहीतर मला जीव द्यावा लागेल.
काउन्सेलर -
जीव दिल्याने तुला न्याय नाही मिळणार. तुझ्या सर्व अडचणी आम्ही दूर करू. असे पाऊल उचलू नकोस. 
यानंतर ती तरुणी थांबली. म्हणाली की- मला लवकरात लवकर मदत करा. तथापि, तिने फाशी घेण्याआधीच पोलिस तेथे पोहोचले.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित फोटोज व शेवटच्या स्लाइडवर घटनेचा Video...

बातम्या आणखी आहेत...