आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

70 लाखांच्या कारमध्ये भरला कचरा, व्हॅलेंटाइनला वडिलांना गिफ्ट केली होती कार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळ - पंतप्रधानांच्या स्वच्छ भारत अभियान आणि महापालिकेच्या स्वच्छता अभियानात सहभागी होत भोपाळच्या एका व्यक्तीने थेट 70 लाखाची कार कचरा गोळा करण्यासाठी वापरली आणि या कामात सहभाग नोंदवला. या व्यक्तीचे नाव अभिनीत गुप्ता आहे. ते पेशाने डॉक्टर आहेत. त्यांचे स्वतःचे एक स्किन क्लिनिक आहे. त्यांना ही लक्झरी कार व्हॅलेंटाइन डेला वडिलांनी गिफ्ट केली होती. 


स्वच्छतेसाठी पसरवू इच्छितात जनजागृती 
- अभिनितने सांगितले की, एवढ्या महागड्या कारने कचरा गोळा करण्याचा उद्देश लोकांमध्ये स्वच्छतेप्रति जनजागृती पसरवणे हा आहे. 
- शक्य होईल आणि संधी मिळेल त्याठिकाणी स्वच्छतेसाठी पुढाकार घेतात असे ते म्हणाले. त्यांचे कुटुंबही या कामात त्यांना मदत करते. या कॅम्पेनमध्ये वडिलांनीही त्याचा उत्साह वाढवला. 
- त्यांनी कारच्या मागे एक ट्रॉली अटॅच केली आणि शहरातील विविध भागांतून कचरा गोळा केला. असे केल्याने लोकांमध्ये स्वच्छतेप्रती जागरुकता निर्माण होईल असे त्यांना वाटले. 


वडिलांनी गिफ्ट केली होती कार 
डॉ. अभिनीत यांनी वडिलांना त्यांच्या निवृत्तीनिमित्त एक मर्सिडिझ कारही गिफ्ट केली होती. ते वडिलांना रोल मॉडेल मानतात. त्यामुळे त्यांना व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने वडिलांना लक्झरी कार गिफ्ट केली होती. 


वडिलांना युनिक गोष्टींची आवड 
गुप्ता यांनी सांगितले की, त्यांच्या वडिलांना युनिग गोष्टी जमवण्याचा छंद आहे. लोक वारंवार अशा गोष्टी पाहत असतात. डॉ. अभिनीत यांच्या वडिलांकडे अनेक जुन्या वस्तू ठेवलेल्या आहेत. त्या आजच्या काळात पाहायला मिळणेही कठीण आहे. त्यांच्या वडिलांकडे कॉलेजच्या काळातील ग्रामोफोन, जुनी तीन चाकी कार, जुन्या बाइक्स अशा अनेक वस्तू आहेत.

बातम्या आणखी आहेत...