आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न सांगता सुटी घेतल्याने पंपमालक चिडला, दलित तरुणाला बांधून मारले चाबकाचे 100 फटके

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

होशंगाबाद (मध्य प्रदेश) - शहरातील एका पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या दलित तरुणाला त्याने न सांगता सुटी घेतल्याने भयंकर शिक्षा देण्यात आली. पंप मालकाने तरुणाला पंपाला बांधले आणि त्याच्यावर निर्दयीपणे चाबूक ओढला. एवढेच नाही, त्याने या घटनेचा व्हिडिओही मोबाइलमध्ये शूट करायला लावला. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पंपमालकाविरुद्ध पोलिसांनी एफआयआर दाखल केली आहे. दोन्ही आरोपींना अटकही करण्यात आली आहे. त्यासोबतच घटनास्थळावरून मारहाणीसाठी वापरलेला चाबूकही ताब्यात घेण्यात आला आहे. 

 

घरातून बोलावून मालकाने मारले चाबकाचे फटके: 
पोलिसांनी सांगितले की, रायपूरचा रहिवासी अजय अहिरवार पेट्रोल पंपावर काम करतो. काही दिवसांपूर्वी त्याचा अॅक्सिडेंट झाला होता, यामुळेच त्याने पंपमालक दीपक साहूला न सांगता सुटी घेतली होती. परंतु यावरून मालक नाराज झला आणि त्याने अजयला बोलावण्यासाठी त्याच्या घरी पंपावर काम करणाऱ्या चिंटू साहूला पाठवले. अजय पंपावर आल्यावर दीपक आणि चिंटूने त्याला पंपाला बांधले. यानंतर 10 मिनिटे सलग 100 हून जास्त चाबकाचे फटके त्याला मारले. पीड़ित अजय कसाबसा त्यांच्या तावडीतून निसटून आपल्या नातेवाइकाच्या गावी पळून गेला. यानंतर पीडित अजयने ग्रामीण पोलिसांत चिंटू आणि दीपकविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. एएसपी राकेश खाखा म्हणाले की, पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करून त्यांची तुरुंगात रवानगी केली आहे. पुढील तपास सुरू आहे.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, या घटनेचा Viral Video व Photos...    

 

 

बातम्या आणखी आहेत...