आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Video: गँगरेप करणाऱ्या आरोपींची पोलिसांनी रस्त्यावरून काढली धिंड, उपस्थित मुलींनीही दिला असा चोप

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळ - भोपाळच्या एका हॉटेलमध्ये नोकरी देण्याच्या बहाण्याने बोलावून मंगळवारी रात्री एका तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. पीडिता मंडला येथील रहिवासी आहे. दोन्ही आरोपी एका हॉटेलमध्ये काम करतात. पोलिसांनी दोघांनाही अटक करून बुधवारी त्यांची धिंड काढली. यादरम्यान आरोपींना रस्त्यावरील संतप्त जमावाने चोप दिला. तेथे उपस्थित काही तरुणींनीही त्यांना चापटा मारल्या.

 

असे आहे प्रकरण

- पोलिसांच्या मते, पीड़िता मंगळवारी सकाळी रेल्वेने भोपाळला आली. तिच्या परिचित शैलेंद्र कुशवाह यांनी तिला आयएसबीटी बस स्टँडच्या जवळ दुपारी भेटण्यासाठी बोलावले. पीड़िता तेथे पोहोचल्यावर शैलेंद्रने सांगितले की, तुझ्या मुक्कामाची सोय मी केलली आहे. खान भाईच्या रूममध्ये थांब. थोड्या वेळाने तेथे खान भाईसुद्धा आला. यानंतर आणखी दोघे जण आले.

- तिघेही तेथून पीडितेला एका रूममध्ये घेऊन गेले. येथे खान भाईसोबत गेलेल्या दोघांनी पीडितेवर बलात्कार केला. बलात्कार करणारे राहुल आणि मोनू नावाचे दोन्ही आरोपी भोपाळच्या हॉटेल राजहंसमध्ये कुक आहेत.


पोलिसांनी काढली धिंड
आरोपींच्या तावडीतून सुटून पीड़ितेने थेट पोलिसांत धाव घेतली. पीड़ितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी बुधवारी बलात्कार करणाऱ्या दोन्ही आरोपींना - मोनू शर्मा आणि राहुल ठाकूर यांना अटक केली. या प्रकरणातील इतर आरोपींचा शोध सुरू आहे. दुसरीकडे, बुधवारी दुपारी पोलिसांनी दोन्ही आरोपींची गोविंदपुरा पोलिस स्टेशनपासून अन्नानगरपर्यंत धिंड काढली. यादरम्यान करियर कॉलेजच्या काही विद्यार्थिनी आणि अन्ना नगरच्या महिलांनी आरोपींची यथेच्छ धुलाई केली.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, पोलिसांनी आरोपींची धिंड काढलेला video व Photos... 

 

बातम्या आणखी आहेत...