आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थरारक Video: महापुरात एका दगडावर अडकले 2 तरुण, 3 तासांनी अशी झाली सुटका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्योपूर, मप्र - मध्य प्रदेशात मान्सूनच्या जोरदार आगमनासोबतच नद्यांना पूर आला आहे. श्योपूरच्या मोरडुंगरी नदीला बुधवारी मान्सून पहिल्याच जोरदार पावसानंतर पूर आला. यादरम्यान नदीवर अंघोळीला गेलेले 2 तरुण महापुराच्या मधोमध एका दगडावर अडकले. तब्बल 3 तास चाललेल्या मदत कार्यानंतर त्यांना पुरात वाहून जाण्यापासून वाचवण्यात यश आले. गांधीनगरचे रहिवासी आरिफ (22) आणि प्रेम (28) नदीवर अंघोळीला गेले होते. ते जेव्हा तेथे पोहोचले, तेव्हा नदीमध्ये खूप कमी पाणी होते. तेवढ्यात वेगवान पावसाला सुरुवात झाली. पाहता पाहताच पाण्याचा प्रवाह वाढला आणि नदीच्या पाणी पातळीत एकदम मोठी वाढ झाली.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, अडकलेल्या 2 तरुणांना वाचवतानाचा थरारक Video...  

 

बातम्या आणखी आहेत...