आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • A Fire In The Train Going From Visakhapatnam To New Delhi, Four Bogies Are In The Grip

एपी एक्सप्रेसचे दोन डबे जळून खाक, 37 कलेक्टर थोडक्यात वाचले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्वाल्हेर - हजरत निजामुद्दीनहून विशाखापट्टनमला जाणाऱअया एपी एसी एक्स्प्रेसला मध्यप्रदेशातील ग्वाल्हेर जवळील बिरला नगर पुलाजवळ आग लागली आहे. एक्स्प्रेसचे दोन डबे आगीच्या भक्षस्थानी पडले आहेत. रेल्वे लागलीच थांबवून प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. ज्या डब्यांना आग लागली त्यामध्ये 37 जिल्हाधिकारी होते अशी माहिती समोर येत आहे. ते दिल्लीला ट्रेनिंग पूर्ण करुन भोपाळला येत होते. या सर्वांना वाचवण्यात यश आले आहे. 

 

- एपी एसी एक्स्प्रेलसा आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर 15 पेक्षा जास्त बंब घटनास्थळी दाखल झाले होते. एपी एसी एक्स्प्रेश हजरत निजामुद्दीनहून स्टेशन दिल्लीहून व्हाया भोपाळ विशाखापट्टनम या मार्गावर धावते. 
- शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असण्याची शक्यता रेल्वे अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे. प्रवाशांचे सामान पूर्णपणे जळाले आहे. आगीत बी-6 आणि बी-7 या दोन डब्यांचा कोळसा झाला. 
- आगीच्या घटनेमुळे दिल्लीला जाणाऱ्या रेल्वे प्रभावित झाल्या आहेत. 
- ज्या डब्यांना आग लागली होती, त्यांना रेल्वेपासून वेगळे करण्यात आले आहे. त्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला. ही घटना ग्वाल्हेरपासून पाच किलोमीटरवर असलेल्या बिरला नगर जवळ सोमवारी सकाळी 11 वाजता घडली. दुपारपर्यंत आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. 

बातम्या आणखी आहेत...