आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Viral होत आहे ही लग्नपत्रिका, लाडक्या लेकीच्या लग्नात वधुपित्याने उचलले कौतुकास्पद पाऊल A Unique Initiative Against Dowry

Viral होत आहे ही लग्नपत्रिका, लाडक्या लेकीच्या लग्नात वधुपित्याने उचलले कौतुकास्पद पाऊल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुरेना (ग्वाल्हेर) - हुंडाबंदीचे पालन गुर्जर समाजामध्ये सुरू झाले आहे. विनाहुंड्याचे लग्न करायलाही तरुण तयार असल्याचे दिसते. याची सुरुवात एका पित्याने आपल्या मुलीच्या लग्नापासून केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वडिलांचे नाव इन्द्रसिंह गुर्जर असून ते आपल्या मुलीच्या लग्नात कोणताही हुंडा देणार नाहीत. याचा पुरावा त्यांच्या मुलीची लग्नपत्रिकाच आहे. 

 

20 जूनला आहे लग्न...
- पूजाच्या लग्नपत्रिकेत संत हरिगिरी महाराजांनी ठरवलेल्या खर्चाचा पूर्ण उल्लेख आहे. ज्यात लिहिले आहे की, लग्न लावायला येणाऱ्या ब्राह्मणाला 1100 रुपयांची दक्षिणा दिली जाईल. याशिवाय थाळी 5100 रुपये, लगुन 1100 रुपये, दरवाजा 1100 रुपये, भात 5100 रुपये, वरमाला 10 रुपये, टिळा 50 रुपये, पान 1100 रुपये व 5 भांडी आणि कूलर, कपाट, पलंग इत्यादी देण्यात येत आहे.

- लग्नात फक्त 100 वऱ्हाडींचाच सत्कार केला जाईल. वडील म्हणाले की, त्यांची मुलगी पूजाचा विवाह अतेन्द्रसिंह गुर्जरसोबत 20 जून रोजी आहे.

 

मद्य पिऊन न येण्याचे आवाहन
- लग्नपत्रिकेवर हुंडाबंदीचा उल्लेखच नाही, तर दारूबंदीचाही परिणाम दिसत आहे. पत्रिकेवर स्पष्टपणे छापले आहे की, कोणीही दारू पिऊन लग्नसमारंभात येऊ नये.
- पत्रिकेवर टीप छापण्यात आली आहे, ज्यानुसार हा आदेश संत हरिगिरी महाराजांचा आहे. मुलीचे काका म्हणाले की, समाजात दारूबंदी आधीच झालेली आहे आणि आता हुंडाबंदीचेही पालन होत आहे. ही सर्व संतकृपा आहे.

 

बेटी बचाओचे आवाहन
- पूजाच्या लग्नपत्रिकेत बेटी बचाओ-बेटी पढ़ाओचे आवाहनही करण्यात आले आहे. कार्डाच्या एका भागात बेटी बचाओ-बेटी पढ़ाओ आणि हुंडा देणार नाही, घेणारही नाही असे आवाहन करण्यात आले आहे. याशिवाय लग्नपत्रिकेवर छापलेले एक घोषवाक्यही सर्वकाही सांगून जाते.
स्लोगन असे आहे...

"मृत्यु भोज और माला छूटी, खाना छूटा मेज पे। बाजे छूटे दारू छूटी, अब की चोट दहेज पे।।"

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, या लग्नपत्रिकेचे आणखी काही Photos...   

बातम्या आणखी आहेत...