आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भीषण अपघातात धडावेगळे झाले अर्धे डोके, कारच्या दारावर लटकला भावाचा मृतदेह

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कारच्या दारवाजाला तरुणाचा मृतदेह लटकलेला होता. - Divya Marathi
कारच्या दारवाजाला तरुणाचा मृतदेह लटकलेला होता.

भोपाळ - मित्रांसोबत गुरुवारी सकाळी नाष्टा करायला हायवे ट्रीट डोडीला जाणाऱ्या 5 मित्रांच्या कारचा भीषण अपघात झाला. अपघात एवढा भयानक होता की, 3 जणांचा जागीच मृत्यू झाला. यात 2 सख्खे भाऊ होते, तर दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. मृतांमध्ये एकाचा मृतदेह कारच्या दारावर लटकलेला आढळला. तर दुसऱ्याचे अर्धे डोके शरीरापासून वेगळे झाले होते. अपघात सीहोर हायवेवर एका ट्रकला ओव्हरटेक करताना झाला.


असा झाला अपघात...
- गुरुवारी सकाळी 7.30 वाजता भोपाळहून इंदूरकडे जाणाऱ्या एका मारुती सियाज कार सोंडा खोकरी रोडजवळ अनियंत्रित होऊन उलटली. यानंतर ती झाडाला जाऊन धडकली.
- या अपघातात कारमध्ये स्वार 3 तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. 
- जखमींना 108च्या मदतीने उपचारांसाठी नेण्यात आले, येथून प्राथमिक उपचारांनंतर त्यांना भोपाळला रेफर करण्यात आले.
- पोलिस प्रदीप गुर्जर म्हणाले, भोपाळच्या कोलार रोडवरील भीमाकुंज येथील रहिवासी कुणाल अग्रवाल कुणाल पुत्र प्रमोद अग्रवाल 23 वर्ष, यश कमल अरोरा 17 वर्षे आणि हर्ष राजेश अरोरा 18 वर्षे यांचा जागीच मृत्यू झाला.
- या अपघातात जखमी कार्तिक बसन्या आणि कुशाग्र अग्रवाल यांना भोपाळला रेफर करण्यात आले आहे.

 

मंत्री पारस जैन यांनी केली जखमींची मदत...
- इंदूर-भोपाळ रोडवरून जात असलेल्या कॅबिनेट मंत्री पारस जैन यांनी आपली कार थांबवून जखमींना मदतीसाठी पोलिसांना कळवले. घटनास्थळावर जवळच्याच पेट्रोल पंपाचा स्टाफ सर्वात आधी पोहोचला होता, त्यांनी जखमींची मदत केली.

 

ट्रक सारखा उजवीकडे-डावीकडे करत होता..

- जखमी कार्तिक पोलिसांना म्हणाला की, सीहोरच्या पुढे गेल्यावर सकाळी 7.30 वाजता खोकरीजवळ आमच्या सियाज कारच्या मागे आणि पुढे ट्रक चालत होते. पुढचा ट्रकवाला अचानक उजवीकडून डावीकडे गेला, तेवढ्यात कार्तिकनेही आपली कार वेगाने ओव्हरटेक करून पुढे निघण्याचा प्रयत्न केला. यामुळे कार रस्त्याखाली उतरून अनियंत्रित झाली आणि पलटत दूर जाऊन झाडाला धडकली. 

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, या भीषण अपघाताचे आणखी फोटोज...

बातम्या आणखी आहेत...