आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नातेवाइकाने केला खुलासा, लग्नासाठी नाही फॅमिली व्हॅकेशनवर गेले आहेत विराट♥अनुष्का

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळ - टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा इटली आणि जर्मनीच्या फॅमिली व्हॅकेशनवर गेले आहेत. ते सध्या लग्न करणार नाहीत. ही माहिती DivyaMarathi.Com ला आपले नाव जाहीर न करण्याच्या अटीवर त्याच्या खूप जवळच्या नातेवाइकाने दिली आहे.

 

नातेवाइकाने सांगितले असे...
- विराटच्या नातेवाइकाने कन्फर्म करत सांगितले की, ही फक्त माध्यमांतील अफवा आहे. यात बिलकूल तथ्य नाही. याआधीही जेव्हा विराट कोहलीने सुट्या घेण्याविषयी चर्चा झाली तेव्हाही मीडियामध्ये लग्नाबद्दलच्या अफवा आल्या होत्या.  जर तो लग्न करत असेल तर कमीत कमी आम्हाला तरी याची माहिती झाली असती.

 

मीडियाने क्रिएट केला बझ...
- वास्तविक, विरोट आणि अनुष्काचे इटलीला जाणे मीडियात बझ क्रिएट करत आहे की, ते गुपचूप लग्न करत आहेत. मीडियात वृत्त आहे की, तो 12 डिसेंबरला लग्न करत आहे आणि इथपर्यंत सांगितले जात आहे की, तो लग्नाचे रिसेप्शन 21 ला मुंबईत देणार आहे.


चुलती म्हणाली होती, निमंत्रण मिळाले नाही... 
- मध्य प्रदेशच्या कटनी शहरात राहणारी विराटची सख्खी चुलती आणि कटनी विकास प्राधिकरणाच्या उपाध्यक्षा आशा कोहली DivyaMarathi.Com ला म्हणाल्या की, आम्ही विराट कोहलीच्या लग्नाबाबत कोणतीही माहिती नाहीये. त्यांनी तर असेही म्हटले की, जर त्याचे लग्न असेल तर आम्हाला तरी निमंत्रण मिळालेले नाही.

बातम्या आणखी आहेत...