आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभोपाळ - अॅक्ट्रेस अनुष्का शर्मा आणि वरुण धवनचा नवा चित्रपट 'सुईधागा'ची शूटिंग मध्य प्रदेशात सुरू आहे. या शूटिंगचे पुढचे शेड्यूल भोपाळमध्ये ठेवण्यात आले आहे. रविवारी अनुष्का शर्मा भोपाळ हलालपूर बस स्टँडवर सूती साड़ी घातलेली दिसली. येथे अनुष्काने एकदम साधारण गुलाबी-सफेद साडी घातलेली होती. फ्लोरल प्रिंट असलेल्या साडीमध्ये ती त्रासिक एक्स्प्रेशनसाठी काही पावले चालली. यानंतर डायरेक्टरने शॉट ओके केला. दोन्ही स्टार चित्रपटाचे मुख्य सीन शूट करण्यासाठी भोपाळला पोहोचले आहेत. तिथेच चित्रपटाचे काही सीन्स निशातपुरा रेल्वे हॉस्पिटलमध्येही शूट करण्यात आले.
मेक इन इंडिया थीमवर आधारित आहे चित्रपट
- मेक इन इंडिया थीमवर बनणाऱ्या 'सुई धागा' चित्रपटाला मध्यप्रदेशच्या रिअल लोकेशनवर शूट केले जात आहे. चित्रपट दिग्दर्शक शरत कटारिया रिअल लोकेशनसाठी कोणतीही कसर सोडत नाहीयेत. यासाठी चित्रपटाची शूटिंग चंदेरी साडीवर केली जात आहे. तथापि, चंदेरीच्या साड्या देशभरात प्रसिद्ध आहेत. येथील विणकर परिवार नोकरी करत नाहीत. तर आपापल्या घरांमध्ये छोटे-छोटे हँडलूम लावून विणकाम करतात.
जबरदस्त आहे वरुण अन् अनुष्काची केमेस्ट्री
- यापूर्वी हॉस्पिटलमध्ये झालेल्या शूटमध्ये दोन्ही कलाकारांनी जास्त टेक घेतले नाहीत. आपल्या कसदार अभिनयाने त्यांनी ठरलेल्या वेळेत चित्रपटाचे शेड्यूल पूर्ण केले. सीनदरम्यान अनुष्का आणि वरुणदरम्यानही काही सीन शूट करण्यात आले. दोन्ही कलाकारांची केमेस्ट्री पाहण्यासारखी होती.
एक झलक मिळवण्यासाठी फॅन्सची धडपड
- बस स्टँडवर झालेल्या शॉटमध्ये एका साधारण महिलेच्या गेटअपमध्ये नजरेस आली. यादरम्यान बस स्टँडवर अनुष्काला पाहण्यासाठी तिचे फॅन्स प्रयत्न करत राहिले, परंतु सुरक्षा व्यवस्था कडक असल्याने फॅन्सची निराशा झाली.
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, आणखी काही फोटोज...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.