आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करन्सी प्रेस नोट चोरी: या बुटाच्या मदतीने अधिकाऱ्याने असे जमवले 90 लाखांचे घबाड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उपनियंत्रक मनोहर वर्माला सीआयएसएफने शुक्रवारी 200-200 च्या नव्या नोटांची दोन बंडलं चोरून घेऊन जाताना रंगेहाथ पकडले. त्याच्या डस्टबिन आणि लॉकरमधून 26 लाख 9 हजार 300 रुपये जप्त करण्यात आले. - Divya Marathi
उपनियंत्रक मनोहर वर्माला सीआयएसएफने शुक्रवारी 200-200 च्या नव्या नोटांची दोन बंडलं चोरून घेऊन जाताना रंगेहाथ पकडले. त्याच्या डस्टबिन आणि लॉकरमधून 26 लाख 9 हजार 300 रुपये जप्त करण्यात आले.

इंदूर - मध्य प्रदेशातील देवास येथील नोटांची छपाई करणाऱ्या कारखान्यातून (करन्सी प्रेस) शुक्रवारी उपनियंत्रक मनोहर वर्मा यास 200 रुपयांच्या नव्या नोटा चोरून नेताना पकडण्यात आले. सीआयएसएफने त्याच्या कार्यालयातील डस्टबिन, लॉकरमधून 26 लाख 9 हजार 300 रुपये मूल्याच्या नोटा जप्त केल्या, तर घरातील दिवाणमध्ये ठेवलेल्या, बुटांचे बॉक्स व कपड्यांच्या पिशव्यांमध्ये 64.5 लाख रुपये सापडले. या सर्व 200 व 500 च्या नोटा आहेत. त्याच्याकडून एकूण 90 लाख रुपये मुल्याच्या नोटा जप्त करण्यात आल्या. वर्मा बीएनपीमध्ये नोटा व्हेरिफिकेशन विभागाचा प्रमुख होता. यामुळे या पदावरील अधिकाऱ्यांची झडती घेता येत नाही, याच सुविधेचा त्याने फायदा घेतला. तो नोटा बुटांतून व कपड्यातून लपवून नेत होता. सीआयएसएफने त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. 

 

असा पकडला अधिकारी चोर 
- देवास येथील टाकसाळीतील उपनियंत्रक नोटा चोरून नेताना रंगेहाथ पकडला गेला. परंतु सीआयएसएफला त्याच्यावर एक दिवस आधी संशय आला होता. 
- टाकसाळीतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या तपासणी शाखेत वर्मा अधिकारी म्हणून आला, तेव्हा दोन जवान बाहेर पहारा देत असत. 
- एक जवान एकीकडून यायचा, तर दुसरा त्याच्या विरुद्ध बाजूने फिरत असे. जवान चकरा मारत असताना मनोहर वर्मा त्यांचे निरीक्षण करायचा आणि संधी साधून नोटांची गड्डी डस्टबिनमध्ये टाकून देत होता. 
- सीआयएसएफच्या जवानास 18 जानेवारी रोजी मनोहर वारंवार बॉक्समध्ये काही तरी टाकत असल्याचा संशय आला. ही माहिती त्याने अधिकाऱ्यांना दिली. त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले. पण काही स्पष्ट झाले नाही. 
- यावर कॅमेरा उपनियंत्रकांच्या केबिनवर ठेवला व जवानास काचेतून लपून आतील हालचाली पाहण्यास सांगितले. 
- 19 जानेवारी रोजी एक अधिकारी कॅमेऱ्यातील हालचाली पाहण्यास स्वत: बसले आणि जवानास काचेमागे लपण्यास सांगितले. त्याच वेळी वर्मा डस्टबिनमध्ये रुपये टाकत असताना रंगेहाथ पकडण्यात आला. 
-  सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांनी केबिनची झडती घेतली. तेव्हा तपासणी करताना त्याचे बूट काढले. तेव्हा बुटात 200 रुपयांची गड्डी सापडली.

 

पुढील स्लाइडमध्ये वाचा, केव्हा आला होता तपासणी विभागात... 

बातम्या आणखी आहेत...