आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेवास- मध्य प्रदेशातील देवास येथील नोटांची छपाई करणाऱ्या कारखान्यातून (करन्सी प्रेस) शुक्रवारी उपनियंत्रक मनोहर वर्मा यास २०० रुपयांच्या नव्या नोटा चोरून नेताना पकडण्यात आले. सीआयएसएफने त्यांच्या कार्यालयातील डस्टबिन, लॉकरमधून २६ लाख ९ हजार ३०० रुपये मूल्याच्या नोटा जप्त केल्या, तर घरातील दिवाणमध्ये ठेवलेल्या बुटांचे बॉक्स व कपड्यांच्या पिशव्यांमध्ये ६४.५ लाख रुपये सापडले. ही सर्व २०० व ५०० च्या नोटा आहेत. त्याच्याकडून एकूण ९० लाख जप्त करण्यात अाले. वर्मा बीएनपीमध्ये नोटा व्हेरिफिकेशन विभागाचे प्रमुख होते. यामुळे या पदावरील अधिकाऱ्यांची झडती घेता येत नाही, याच सुविधेचा त्यांनी फायदा घेतला. ते नोटा बुटांतून व कपड्यातून लपवून नेत असत. सीआयएसएफने त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. नोटा चोरल्याच्या आरोपावरून अटक झाली.
शाखेत होते नोटांची तपासणी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मनोहर वर्मा १९८४ मध्ये कारकून म्हणून टाकसाळीत रुजू झाले. विविध शाखांत त्यांनी काम केले. काही दिवसांपूर्वीच नोटा तपासणी विभागात ते रुजू झालेे. यात ते फिनिशिंग -१ शाखेत काम करत होते.
थंडीच्या दिवसांत जाकिटातून नोटा
चौकशीत आरोपीने पोलिसांजवळ दिलेल्या कबुली जबाबात सांगितले, थंडीच्या दिवसांत जाकिटातून नोटांच्या गड्ड्या चोरून नेत होतो. अधिकारी असल्याने जुजबी तपासणी होत असे. त्यामुळे कोणालाही संशय येत नव्हता.
एक दिवस आधी संशय
देवास येथील टाकसाळीतील उपनियंत्रक नोटा चोरून नेताना रंगेहाथ पकडले गेले. परंतु सीआयएसएफला त्यांच्यावर एक दिवस आधी संशय आला होता. टाकसाळीतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या तपासणी शाखेत वर्मा अधिकारी म्हणून आले, तेव्हा दोन जवान बाहेर पहारा देत असत. एक जवान एकीकडून यायचा, तर दुसरा त्याच्या विरुद्ध बाजूने फिरत असे. जवान चकरा मारत असताना मनोहर वर्मा त्यांचे निरीक्षण करत आणि संधी साधून नोटांची गड्डी डस्टबिनमध्ये टाकून देत. सीआयएसएफच्या जवानास १८ जानेवारी रोजी मनोहर वारंवार बॉक्समध्ये काही तरी टाकत असल्याचा संशय आला. ही माहिती त्याने अधिकाऱ्यांना दिली. त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले. पण काही स्पष्ट झाले नाही. यावर कॅमेरा उपनियंत्रकांच्या केबिनवर ठेवला व जवानास काचेतून लपून आतील हालचाली पाहण्यास सांगितले. १९ जानेवारी रोजी एक अधिकारी कॅमेऱ्यातील हालचाली पाहण्यास स्वत: बसले आणि जवानास काचेमागे लपण्यास सांगितले. त्याच वेळी वर्मा डस्टबिनमध्ये रुपये टाकत असताना रंगेहाथ पकडण्यात आले. सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांनी केबिनची झडती घेतली. तेव्हा तपासणी करताना त्यांचे बूट काढले. तेव्हा बुटात २०० रुपयांची गड्डी सापडली.
अशी करत होता नोटांची चोरी
- बँक नोट प्रेस देवास येथे वरिष्ठ निरीक्षक असलेला मनोहर वर्मा 1984 पासून येथे नोकरीला होता. निरीक्षक असल्यामुळे त्याची कोणी फार बारकाईने चेकिंग करत नव्हते. याचाच फायदा उचलत गेल्या तीन महिन्यांपासून बुटांमध्ये 500-500 च्या नोटा लपवून तो घेऊन जात होता.
- गेल्या काही दिवसांपासून तो जरा जास्तच टेबलखाली वाकत होता. त्याच्या हलचाली संशयास्पद वाटत होत्या. त्यामुळे सहकारी कर्मचाऱ्यांना त्याच्यावर संशय आला. त्यांनी त्याच्यावर नजर ठेवण्यास सुरुवात केली. याशिवाय अधिकाऱ्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे देखील त्याच्याकडे वळवले.
- चेकिंक दरम्यान त्याच्या बुटांमधे आणि सॉक्समधे 500 रुपयांच्या नोटा ठेवलेल्या सापडल्या. चौकशीत मनोहर वर्माने नोटा बाहेर घेऊन जात असल्याचे कबूल केले.
- यानंतर त्याच्या घराची तपासणी करण्यात आली त्यात एका बॉक्समध्ये नोटांचे बंडल सापडले. पोलिसांनी वर्माची पत्नी आणि मुलांकडेही चौकशी केली.
- चौकशीत वर्माने सांगितले की गेल्या 3 महिन्यांपासून तो चोरीचे काम करत होता. प्रेसमध्ये निरीक्षक असताना रिजेक्टेड नोटांची जबाबदारी त्याच्याकडे होती. त्याचाच त्याने फायदा उचलला. थोडासा डिफेक्ट असला तरी तो नोट रिजेक्ट करत होता. रिजेक्ट नोटांना परत पाठवत होता, तर त्यापैकी चालू शकतील अशा फार थोड्या डिफेक्टच्या नोटा बुटामध्ये लपवून घरी घेऊन जात होता.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, देवामध्ये छापल्या जातात या नोटा...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.