आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • घटनेच्या दिवशी भय्यूजींनी दिली होती डॉ. आयुषींना साडी Bhaiyyu Ji Death Reaspn Not Cleat In Investigation

घटनेच्या दिवशी भय्यूजींनी दिली होती डॉ. आयुषींना साडी, म्हणाले- ही घालून जा डिग्री घ्यायला...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंदूर - ज्या दिवशी (12 जून) भय्यू महाराजांनी आत्महत्या केली, त्या दिवशी महाराज जेव्हा सकाळी उठले तेव्हा पत्नी आयुषीसोबत ते नॉर्मल वागले होते. कौटुंबिक सूत्रांनुसार, आयुषी यांनी आपली डिग्री आणण्यासाठी जायचे असल्याचे सांगितले तेव्हा महाराज त्यांना म्हणाले होते, डिग्री खूप महत्त्वाची असते. चांगली तयार होऊन जा. त्यांनी आपल्या हातांनी साडी काढून आयुषींना देत म्हटले होते की, ही साडी घालून जा. यानंतर आयुषी तयार होऊन महाराजांचे आवडते जेवण तयार करून घरातून निघाल्या होत्या.

 

7 दिवसांत 20 हून जास्त जणांचे जबाब
- पोलिसांनी 7 दिवसांत 20 हून जास्त जणांचे जबाब घेऊन 85 टक्के चौकशी पूर्ण झाल्याचा दावा केला आहे, परंतु भय्यू महाराजांनी आत्महत्या का केली, हे अजूनही स्पष्ट झाले नाही. पोलिस आत्महत्येच्या मागे कौटुंबिक कलहच मुख्य कारण मानत आहेत, परंतु हे सांगत नाहीत की, अशी कोणती परिस्थिती उद्भवली ज्यामुळे त्यांनी स्वत:वर गोळी झाडली.

- डीआयजी हरिनारायणाचारी मिश्र म्हणाले, उर्वरित 15 टक्के चौकशीत पोलिसांना भय्यू महाराजांशी संबंधित इतर अनेकांचे जबाब घ्यायचे आहेत. घरातून जप्त करण्यात आलेले मोबाइल फोन, गॅजेट्स आणि कॉम्प्युटरचीही तपासणी व्हायची आहे. भय्यू महाराजांना कोणत्या गोष्टींचा तणाव होता, त्या बाबी अजून स्पष्ट व्हायच्या आहेत. आत्महत्येबद्दल पोलिसांनी घटनेचे रि-क्रिएशनही केले आहे.
- आत्महत्येदरम्यान गोळी महाराजांच्या डोक्याला भेदून आरपार झाली आणि भिंतीत घुसली होती. रि-क्रिएशन केल्यावरही तेथेच घुसली. 20 प्रमुख व्यक्तींच्या जबाबात बहुतांश म्हणाले की, आयुषी आणि कुहूमध्ये वादच तणावाचे मुख्य कारण आहे.


पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये गोळी झाडूनच मृत्यूला दुजोरा
पोलिसांना सोमवारी डॉक्टरांनी भय्यू महाराजांची पोस्टमॉर्टम रिपोर्ट सोपवली. डॉक्टरांनी कानशिलावर रिवॉल्व्हर ठेवून फायर केल्याने मृत्यू झाल्याचे कारण लिहिले आहे. शरीरावर दुसरी कोणतीही जखम आढळली नाही. शिवाय शरीरात कोणतेही केमिकल वा विषारी तत्त्व आढळले नाहीत.

 

प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी : राजपूत करणी सेना
राजपूत करणी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुखदेवसिंह गोगामेडी आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष योगेंद्रसिंह कटार यांनी याप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली. दुसरीकडे, भय्यू महाराजांनी ज्यांना हिंमत देऊन मार्ग दाखवला होता, त्यांत सेंधवाचे व्यावसायिक अजय गोयलही आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, नुकसान होत असल्याने ते हताश झाले होते. तथापि, सुसाइड करण्यासारखा विचार नव्हता, परंतु मोडून पडले होते.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, संबंधित आणखी Photos...  

बातम्या आणखी आहेत...