आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • भय्यू महाराजांची दशक्रिया मुलीने पार पाडली, पत्नी आयुषीही होत्या सोबत; महाराष्ट्रीय पद्धतीने 3 तास विधी Bhaiyyu Maharaj Dashakarma Rituals At Maheshwar

भय्यू महाराजांचे दशक्रिया विधी मुलीने पार पाडले; विदर्भात काढली जाणार अस्थि कलश यात्रा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महेश्वर (खरगोन) - भय्यू महाराजांचे दशक्रिया विधी गुरुवारी नर्मदेच्या बड़घाटावर पार पडले. कन्या कुहूने पूजन केले. पं. राजेंद्र जोशी यांनी महाराष्ट्रीय पद्धतीने दशक्रिया विधी पार पाडले. यादरम्यान डॉ. आयुषीही उपस्थित होत्या, परंतु दोघींनी एकमेकींशी बोलणे टाळलेच. परंपरेनुसार एकादश आणि द्वादशचा कार्यक्रमही नर्मदा तटावरच होईल.


विदर्भात काढण्यात येणार अस्थि कलश यात्रा
ऋषीसंकुल आश्रम, खामगाव (महाराष्ट्र) मधून आलेले प्रमुख एन. टी. देशमुख यांनी इंदुरात भय्यू महाराजांची समाधी स्थापण्याबद्दल त्यांची कन्या कुहू व पत्नी आयुषी यांच्याशी चर्चा केली. ते म्हणाले, नवरात्रि, श्री दत्तजयंती, गुरुपौर्णिमा या उत्सवांत येणाऱ्या अनुयायांना पाहता सूर्योदय आश्रमात समाधी स्थापली पाहिजे. ते म्हणाले, भय्यू महाराज 7 जून रोजी खामगाव आश्रमात आले होते. संपूर्ण विदर्भात अस्थिकलश यात्रा काढली जाईल.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, संबंधित आणखी Photos... 

बातम्या आणखी आहेत...