Home | National | Madhya Pradesh | मोठी बातमी: भय्यू महाराज आत्महत्या: CCTV फुटेज तपासले, घटनेच्या दिवशी त्यांच्या चेहऱ्यावर नव्हता तणाव Bhaiyyu Maharaj House Cctv Footage Under Investigation

भय्यू महाराज आत्महत्या: CCTV फुटेज तपासले, घटनेच्या दिवशी त्यांच्या चेहऱ्यावर नव्हता तणाव

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jun 15, 2018, 10:52 AM IST

भय्यू महाराज (50) यांच्या आत्महत्येचे कोडे सोडवण्यासाठी पोलिसांनी त्यांच्या सिल्व्हर स्प्रिंग स्थित घरातून जप्त 10 सीसीट

 • मोठी बातमी: भय्यू महाराज आत्महत्या: CCTV फुटेज तपासले, घटनेच्या दिवशी त्यांच्या चेहऱ्यावर नव्हता तणाव Bhaiyyu Maharaj House Cctv Footage Under Investigation
  > संत भय्यू महाराजांनी मंगळवारी आत्महत्या केली होती.
  > महाराजांनी सिल्व्हर स्प्रिंग्ज स्थित घरात रिव्हॉल्व्हर कानशिलावर ठेवून गोळी झाडली, जी आरपार झाली.

  इंदूर - भय्यू महाराज (50) यांच्या आत्महत्येचे कोडे सोडवण्यासाठी पोलिसांनी त्यांच्या सिल्व्हर स्प्रिंग स्थित घरातून जप्त 10 सीसीटीव्हींचे डीव्हीआर (डिजिटल व्हिडिओ रेकॉर्डर) सिस्टिम गुरुवारी रात्री पाहिले. डीव्हीआरमध्ये एका महिन्याचे फुटेज आढळले आहे. घटनेच्या दिवशी महाराज रूममध्ये जाताना दिसले. त्यांच्या चेहऱ्यावर कोणताही तणाव नव्हता. यात कुटुंबातील इतर लोकही दिसत आहेत. पोलिसांनी सेवेकरी आणि नोकरांचे जे जबाब घेतले होते, ते फुटेजशी जोडून पाहिले, परंतु कोणतीही असामान्य बाब आढळली नाही. असे सांगितले जात आहे की, त्यांनी तणावामुळे आत्महत्या केली. कारण त्यांची मुलगी आणि दुसरी पत्नी आयुषीमध्ये चांगले संबंध नव्हते.

  रूममध्ये नाही लावले कॅमेरे
  - पोलिसांना संशय आहे की, घरात वाद झाला असेल तर तो रूममध्ये झाला असेल, तेथे कॅमेरे लागलेले नाहीत. महाराजांच्या मोबाइलचे कॉल डिटेलसहित पोलिस अनेक जणांचा सीडीआर काढत आहेत.
  - डीआयजी हरिनारायणाचारी मिश्र म्हणाले की, पोलिस या फुटेज आधारे आणखी माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. सुसाइड नोट आणि त्यांनी लिहिलेल्या काही डायऱ्यांवरील हस्ताक्षराची चाचणी एक्स्पर्टकडून केली जाईल. एएसपी प्रशांत चौबे म्हणाले की, मनोवैज्ञानिकांना फुटेज दाखवून महाराजांच्या मनोस्थितीबद्दल माहिती घेतली जाईल.
  - पोलिसांनी पोस्टमॉर्टमनंतर महाराजांचा व्हिसेरा टिशू तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबला पाठवला आहे. तथापि, स्पष्ट आहे की सुसाइड नोट त्यांनीच लिहिली आहे. तरीही कोर्टात पुरावा म्हणून सादर करण्यासाठी अधिकृत दुजोरा मिळावा म्हणून ही टेस्ट केली जात आहे.

  महाराजांशी लग्न करण्यासाठी तयार नव्हत्या डॉ. आयुषी
  - पोलिस डॉ. आयुषी यांच्याही जुनी माहिती काढत आहेत. यासाठी एक टीम भंवरकुवा परिसरातील परमहंस गर्ल्स होस्टेलला गेली आणि तेथील माजी मॅनेजर सुनील जैन यांच्याकडे चौकशी केली. डॉ. आयुषी पीएचडी करत असताना या होस्टेलमध्ये राहिल्या होत्या.
  - ही बाबसुद्धा समोर आली आहे की, महाराजांशी लग्न करण्याआधी डॉ. आयुषीची मैत्री विवेक नावाच्या तरुणाशी होती. पोलिस विवेकचा शोध घेत आहेत. सूत्रांनुसार, डॉ. आयुषी आधी महाराजांच्या अनुयायी होत्या. महाराजांशी लग्नाचा प्रस्ताव त्यांनी कुटुंबीयांसमोर धुडकावला होता. नंतर काही दबावामुळे त्या तयार झाल्या.

  जी कुटुंबाची इच्छा, तेच होईल -विनायक
  - पोलिस सूत्रांनुसार, तपास अधिकाऱ्यांनी सेवेकरी विनायक यांच्याशी बातचीत केली. सुसाइड नोटमध्ये महाराजांनी त्यांना जबाबदारी सोपवल्यावर विनायक म्हणाले की, कुटुंबाची जी इच्छा असेल, तेच होईल. याबाबत त्यांचे अधिकृतरीत्या जबाब होतील, असे सांगितले जात आहे. यानंतर स्थिती स्पष्ट होऊ शकते.

  पुढच्या स्लाइडवर पाहा, संबंधित आणखी Photos..

Trending