आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Twist In Suicide Mystery: भय्यूजींना राहुल गांधींना भेटून सीक्रेट माहिती द्यायची होती, भेटण्याची वेळही मागितली होती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंदूर - आध्यात्मिक संत भय्यूजी महाराज यांच्या आत्महत्येला (12 जून) 24 दिवस उलटले आहेत. पोलिसांना अद्यापही आत्महत्येच्या कारणांपर्यंत पोहोचता आलेले नाही. दरम्यान, भय्यूजी महाराजांकडे संघाबाबत काही माहिती होती आणि त्यांना ती लवकरात लवकर राहुल गांधींना भेटून सांगायची होती, असा दावा युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष केशवचंद यादव यांनी शुक्रवारी केला. भय्यू महाराजांबद्दलच्या या नव्या खुलाशामुळे खळबळ उडाली आहे. युवक काँग्रेसच्या सभेमध्ये बोलताना केशवचंद यादव म्हणाले की, "भय्यू महाराज आत्महत्या कसे करू शकतात? त्यांना तर राहुल गांधींची भेट घेऊन संघाबाबत काहीतरी सांगायचे होते. अचानक त्यांनी आत्महत्या करणे संशयास्पद आहे, याची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे."

 

राहुल गांधींना भेटून संघाबाबत सांगायचे होते...
- यादव यूथ मेनिफेस्टो कार्यक्रमासाठी इंदुरात आले होते. गांधी भवनात आयोजित कार्यक्रमात ते म्हणाले की, भय्यू महाराज हे सम्माननीय संत होते. त्यांच्या आत्महत्येवर मी प्रश्न उपस्थित करतो. मी माझे म्हणणे मोठ्या हिमतीने समोर ठेवू इच्छितो. नागपुरात राहणारे एका परिचित महाराजांच्या आत्महत्येच्या 3 दिवसांपूर्वी मला भेटले होते. ते म्हणाले होते की, भय्यू महाराज राहुल गांधींना भेटून त्यांना संघाबाबत काहीतरी सांगू इच्छितात. परंतु याच्या दोन दिवसांनंतर भय्यू महाराजांनी आत्महत्या केली. असे काय झाले की, महाराजांना आत्महत्या करावी लागली. या प्रकरणाची चौकशी झालीच पाहिजे.


करणी सेनेनेही लावले होते सरकारवर आरोप
दरम्यान, भय्यू महाराजांच्या आत्महत्येनंतर करणी सेनेच्या राष्ट्रीय अध्यक्षांनीही याप्रकरणी सरकारला जबाबदार ठरवले होते. भय्यूजी महाराजांकडे नर्मदा घोटाळ्याची अतिमहत्त्वाची कागदपत्रे होती, त्यांच्यावर मध्य प्रदेश सरकारचा दबाव होता, म्हणूनच त्यांनी आत्महत्या केल्याचा खळबळजनक आरोप करणी सेनेच्या अध्यक्षांनी यापूर्वी केला होता.

 

भय्यू महाराजांनी स्वत:वर झाडली होती गोळी
- भय्यू महाराजांनी 12 जून 2018 रोजी इंदुरातील सिल्व्हर स्प्रिंग स्थित आपल्या घरात स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली होती. आत्महत्येच्या मागे कौटुंबिक कलहाची बाब समोर आली होती. आत्महत्येच्या कारणांचा शोध लावण्यासाठी पोलिसांनी आतापर्यंत भय्यू महाराजांच्या दुसऱ्या पत्नी आयुषी, त्यांच्या पहिल्या पत्नीपासून झालेली कन्या कुहू यांच्यासह 25 हून जास्त जणांचे जबाब नोंदवले आहेत. परंतु अजूनही कोणतेही ठोस कारण समोर आलेले नाही.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, संबंधित आणखी photos... 

 

 

बातम्या आणखी आहेत...