आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Bhaiyyuji Maharaj Suicide Case Latest Updates Wife Aayushi Was Threatening Bhaiyyuji To Police Complaint

Suicide Mystery: भय्यूजींचा व्हिसेरा रिपोर्ट- शरीरात विष नव्हते, परंतु पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंदूर - भय्यू महाराजांच्या आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी जवळजवळ सर्वांचे जबाब नोंदवले आहेत. नुकताच भय्यूजींचा व्हिसेरा रिपोर्ट आला आहे. रिपोर्टनुसार, भय्यूजी महाराजांच्या शरीरात विष नव्हते. दरम्यान, पोलिसांना चौकशीतून धक्कादायक माहिती समोर आली आहे.

 

सेवेकऱ्याचा दावा

> महाराजांच्या एका सेवेकऱ्याने पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितले की, भय्यू महाराजांची पत्नी भांडणे झाल्यावर त्यांना नेहमी पोलिसांत जाण्याची धमकी द्यायची. हा दावा एका सेवेकऱ्याने केला असून त्याचे म्हणणे आहे की, ही बाब खुद्द महाराजांनीच त्याला सांगितली होती. दुसरीकडे, महाराजांच्या एका मित्राने पोलिसांना सांगितले की, महाराज डॉ. आयुषीचा उल्लेख करून ढसाढसा रडले होते. स्वत:वर गोळी झाडून घेणार असल्याचेही त्यांनी बोलून दाखवले होते.

 

पत्नी आणि मुलीतील वादाचा उल्लेख केला होता

सूत्रांनुसार, त्या व्यक्तीने अधिकाऱ्यांना सांगितले की, सुसाइडच्या महिनाभरापूर्वी भय्यू महाराजांची तब्येत ठीक नव्हती. तेव्हा ते विजयनगरमधील एका खासगी रुग्णालयात अॅडमिट होते. तेव्हा त्यांना ते भेटायला गेले होते. त्या वेळी भय्यू महाराजांच्या पत्नीही तेथेच होत्या. काही काळासाठी जेव्हा एकट्याने बोलण्याची संधी मिळाली तेव्हा महाराजांनी त्यांना पत्नी आणि कन्येमधील वादाबाबत माहिती सांगितली. म्हणाले होते की, आता मला हा ताण सहन होत नाहीये, मी स्वत:वर गोळी झाडेन. जवळच्या एका व्यक्तीनुसार, तेव्हा मी त्यांना धीर दिला होता. काही दिवसांनंतर ते आयुषी यांची समजूत घालण्यासाठी आश्रमातील घरीही पोहोचले होते. परंतु त्यांचे म्हणणे गांभीर्याने घेण्यात आले नाही आणि महाराजांनी बोलून दाखवलेले खरे केले.

 

गुप्त सेवेकऱ्याचे पत्रात आढळली घराची हकिगत...
डीआयजींना मिळालेल्या पत्रातील आणि त्या जवळच्या व्यक्तीने सांगितलेल्या बाबींमध्ये साम्य आढळले आहे. सूत्रांनुसार, ते पत्र महाराजांच्या खूप जवळच्या एखाद्या सेवेकऱ्याने वा परिचिताने लिहिलेले आहे. महाराज काय खायचे, कोणते कपडे घालणे पसंत होते, त्यांच्या आवडीची भाजी कोणती होती, आणि ते कोणत्या गोष्टींमुळे खुश होते? हे सर्व छोट्या-छोट्या संवादांमध्ये वार आणि दिनांकासोबत लिहिलेले आहे. पत्र लिहिणाऱ्याने पत्नी आयुषीद्वारे महाराजांशी झालेल्या काही चर्चेचाही उल्लेख आहे. ज्यात आयुषी महाराजांवर दबाव टाकते. पत्रात काही अशा विवादांबाबत माहिती आहे, ज्यामुळे महाराजांना सेवेकऱ्यांसमोर स्वत:ला लज्जित/ अपमानित वाटू लागले होते.


वाद जाणूनबुजून पसरवण्यात येत आहे...
डॉ. आयुषी यांच्या आई राणी शर्मा यांनी पोलिस चौकशीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, डॉ. आयुषी आणि कुहूमध्ये असलेला वाद जाणूनबुजून पसरवला जात आहे. आत्महत्येचे खरे कारण काही वेगळेच आहे. पोलिसांनी कॉल डिटेलची चौकशी करावी. कौटुंबिक तणावाच्या आडून काही लोक आश्रम अन् कुटुंबाचे वाईट चिंतित होते. 

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, Bhaiyyu Ji Maharaj Suicide Case शी संबंधित आणखी Photos.. 

 

 

बातम्या आणखी आहेत...