आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • मोठी बातमी: भय्यू महाराज मृत्यूचा तपास सुरू, Bhayyu Maharaj Admited In Hospital After Shoot Indore Mp

भय्यू महाराज मृत्यूचा तपास सुरू, पिस्तुलाचे लायसन्स कुणा़च्या नावाने, मोबाइलवर कुणाशी साधला संपर्क?

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंदूर - संत भय्यू महाराज यांच्या मंगळवारी दुपारी त्यांच्या राहत्या घरात झालेल्या मृत्यूचा पोलिसांनी तपास सुरू केला आहे. पोलिसांना पिस्तुलासोबत एक सुसाइड नोटही आढळली आहे. पोलिस पिस्तुलाचे लायसन्स, सीसीटीव्ही फुटेज, मोबाइल कॉल डिटेलच्या सोबतच घरातील सदस्य आणि जवळच्या व्यक्तींची चौकशी करत आहेत. तथापि, मंगळवारी दुपारी 2 वाजता भय्यू महाराजांनी आपल्या स्प्रिंग वॅली घरात स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. पोलिस हत्या वा आत्महत्याच्या दृष्टीने तपास करत आहेत. दुसरीकडे, काँग्रेसने याप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.

- सीएसपी जयंत राठोड म्हणाले की, सर्व पैलूंवर चौकशी केली जात आहे. पोलिसांच्या मते, त्यांची सुसाइड नोट एका छोट्या डायरीत आढळले आहे, जो एका कागदावर दोन्ही बाजूंनी लिहिलेला होता. प्रारंभिक चौकशीत तणावामुळे आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. आम्हाला माहिती मिळाली होती की, भय्यू महाराजांना गोळी लागली आहे आणि कुटुंबीय त्यांना रुग्णालयात घेऊन आले आहेत.


घटनेच्या वेळी पत्नी, आईसहित इतर नोकर उपस्थित होते
- राठोड म्हणाले की, ज्या वेळी घटना झाली त्या वेळी घरात भय्यू महाराजांची आई, पत्नीसोबतच 4 इतर नोकर हजर होते. गोळीचा आवाज ऐकून घरातील सर्व जण रूमकडे धावले. येथे दार आतून बंद होते. कुटुंबीयांनी आवाज देऊनही दार उघडले नाही, म्हणून ते तोडण्यात आले. आतमध्ये भय्यू महाराज रक्तबंबाळ अवस्थेत पडलेले होते. कुटुंबीयांनी तत्काळ त्यांना रुग्णालयात हलवले, जेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

 

मुलीच्या स्टडी रूममध्ये स्वत:वर झाडली गोळी
- राठोड म्हणाले की, भय्यू महाराजांनी ज्या रूममध्ये स्वत:वर गोळी झाडली, ती मुलीची स्टडी रूम आहे. असे काय घडले की, भय्यू महाराजांनी टोकाचे पाऊल उचलले, या बाबीवर पोलिस तपास करत आहेत. पोलिस घरात लागलेल्या सीसीटीव्हीचे फुटेजही तपासत आहेत. यासोबतच भय्यू महाराज, त्यांचे कुटुंबीय व नोकरांचे कॉल डिटेलही तपासले जात आहेत. पोलिसांनी दोन नोकरांची चौकशी केली, परंतु काहीही विशेष माहिती मिळाली नाही.

 

पिस्तुलाचे लायसन्स कुणाच्या नावे?
- घटनास्थळी पोलिसांना एक पिस्तूल सापडले आहे. भय्यू महाराजांच्या कुटुंबीयांनी या पिस्तुलाचा असल्याचे सांगितले असून पोलिस पिस्तुलाचा परवाना खरेच आहे की नाही, आणि आहे तर कुणाच्या नावाने आहे, हे तपासत आहेत.

 

पोलिसांच्या मते, घटना 12.30 वाजेच्या जवळपास झाली...
- सीएसपी जयंत राठोड म्हणाले की, प्राथमिक चौकशीत घटना दुपारी 12.30 वाजे घडल्याचे कळते. भय्यू महाराजांच्या ऑफिशियल ट्विटरवरून दुपारी 1.57 वाजता शेवटचे ट्विट करण्यात आले आहे, याबाबत सीएसपी म्हणाले की, त्यांचे ट्विटर हँडल इतर कुणी हँडल करत असेल, तथापि याबाबीचीही सध्या चौकशी सुरू आहे. पुढच्या 24 चोवीस तासांत कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचण्याचे पोलिस म्हणाले. 

बातम्या आणखी आहेत...