आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Big Update In Bhaiyyu Maharaj Case: Who Wrote Suicide Note Confirmed In Inquiry Report

Bhaiyyuji Suicide Mystery: कुणी लिहिले सुसाइड लेटर- लागला तपास, आत्महत्येचे कारणही स्पष्ट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंदूर - 12 जून रोजी भय्यूजी महाराजांनी इंदुरातील राहत्या घरी आत्महत्या केल्यानंतर पोलिसांना त्या ठिकाणी सुसाइड नोट आढळली होती. या सुसाइड नोटवरील अक्षर भय्यूजी महाराजांचे नव्हतेच अशी शंका व्यक्त करण्यात येत होती. तथापि, पोलिसांनी खात्री करून घेण्यासाठी सुसाइड नोट हस्ताक्षर तज्ज्ञांकडून तपासण्यासाठी पाठवली होती. तिचा तपास अहवाल शनिवारी पोलिसांना प्राप्त झाला आहे. 

सीएसपी मनोज रत्नाकर म्हणाले,  ज्या रूममध्ये भय्यू महाराजांचा मृतदेह आढळला होता, तेथे पोलिसांना दोन सुसाइड नोट आढळल्या. त्या तपासणीसाठी पाठवण्यात आल्या होत्या. त्यावरील अक्षर तपासण्यासाठी भय्यूजींद्वारे लिहिण्यात आलेल्या इतर दस्तऐवजांचे नमुनेही घेण्यात आले होते.

 

महाराजांनीच लिहिली सुसाइड नोट 
तपास अहवालानुसार, आढळलेली सुसाइड नोट ही खुद्द भय्यू महाराजांनीच लिहिली होती. पोलिसांच्या मते, इतर चौकशी रिपोर्ट येणे अद्याप बाकी आहे. सर्व रिपोर्ट मिळाल्यानंतरच पोलिस कोर्टात केस डायरी सादर करतील. 

 

काय होते सुसाइड नोटमध्ये?
6 ओळींच्या सुसाइड नोटमध्ये त्यांनी लिहिले होते की, मी अत्याधिक तणावात असून त्रस्त आहे. मी जात आहे. माझ्या मागे कुटुंबाची काळजी घेण्यासाठी येथे कोणीतरी पाहिजे.

 

दुसरी पत्नी व कन्येतील वादामुळेच होता तणाव
पोलिसांच्या चौकशीतून कौटुंबिक कलह, मानसिक तणाव, बिकट आर्थिक परिस्थिती हे मुख्य कारणे मानण्यात आली. जवळपास 26 जणांच्या जबाबांनंतर पोलिसांनी कुणालाही आत्महत्येसाठी दोषी ठरवले नाही. महाराजांच्या मानसिक ताणाचे मुख्य कारण दुसरी पत्नी डॉ. आयुषी आणि कन्या कुहूमधील भांडण असल्याचे आढळले आहे. 


सर्वात जास्त पत्नी आणि मुलीतील वादाचा उल्लेख
पोलिस तपासात आतापर्यंत जेवढेही जबाब झाले त्यानुसार, दुसरी पत्नी डॉ. आयुषी आणि कन्या कुहूमधील भांडणामुळेच ते तणावात असल्याचे आढळले आहे. सुसाइडच्या महिनाभरापूर्वी भय्यू महाराजांची तब्येत ठीक नव्हती. तेव्हा ते विजयनगरमधील एका खासगी रुग्णालयात अॅडमिट होते. तेव्हा त्यांना ते भेटायला गेले होते. त्या वेळी भय्यू महाराजांच्या पत्नीही तेथेच होत्या. काही काळासाठी जेव्हा एकट्याने बोलण्याची संधी मिळाली तेव्हा महाराजांनी त्यांना पत्नी आणि कन्येमधील वादाबाबत माहिती सांगितली. म्हणाले होते की, आता मला हा ताण सहन होत नाहीये, मी स्वत:वर गोळी झाडेन. जवळच्या एका व्यक्तीनुसार, तेव्हा मी त्यांना धीर दिला होता. काही दिवसांनंतर ते आयुषी यांची समजूत घालण्यासाठी आश्रमातील घरीही पोहोचले होते. परंतु त्यांचे म्हणणे गांभीर्याने घेण्यात आले नाही आणि महाराजांनी बोलून दाखवलेले खरे केले.

 

 

बातम्या आणखी आहेत...