आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भय्यूजी Suicide: आता एकाच व्यक्तीवर सर्वांची नजर; सांगणार महाराजांच्या संपत्तीचे रहस्य

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंदूर - संत भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणात आतापर्यंत जवळजवळ सर्व जबाबांची नोंद पोलिसांनी केली आहे. आता पोलिस त्यांच्या सीएला बोलावण्याची तयारी करत आहेत. जेणेकरून महाराजांच्या उत्पन्नाच्या स्रोतांबद्दल माहिती मिळू शकेल. सीएसपी मनोज रत्नाकर म्हणाले, भय्यूजी महाराजांचे सीए प्रमोद नावाची व्यक्ती असून त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात येणार आहे. तत्पूर्वी, महाराजांची आर्थिक परिस्थिती ठीक नसल्याची बाब समोर आलेली आहे. परंतु ती स्पष्ट होण्यासाठी सीएचा जबाब आवश्यक आहे. तेच सांगू शकतील की, महाराजांना आर्थिक चणचण होती अथवा नाही. दुसरीकडे, पोलिसांनी भय्यू महाराजांची रिव्हॉल्व्हर, सुसाइड नोटच्या तपासणीसाठी पत्र पाठवलेले आहे.

 

बिकट आर्थिक परिस्थिती!

पोलिसांच्या चौकशीतून कौटुंबिक कलह, मानसिक तणाव, बिकट आर्थिक परिस्थिती हे मुख्य कारणे मानण्यात येत आहेत. जवळपास 26 जणांच्या जबाबांनंतर पोलिसांनी कुणालाही आत्महत्येसाठी दोषी मानलेले नाही. महाराजांच्या मानसिक ताणाचे मुख्य कारण दुसरी पत्नी डॉ. आयुषी आणि कन्या कुहूमधील भांडण असल्याचे आढळले आहे. महाराजांनी सेवाकार्यातून निवृत्ती घेतल्यामुळे दानकर्त्यांची संख्याही रोडावली होती. 

 

जवळच्या व्यक्तीने काढले होते आक्षेपार्ह Photo-Video, म्हणून तणावात होते भय्यूजी?

पोलिस अधिकारी मनोज रत्नाकर यांनी सांगितले की, सध्या तरी कौटुंबीक तणाव हेच कारण समोर येत आहे. आर्थिक परिस्थिती किंवा इतर कारणाचा पुरावा मिळालेला नाही. फिंगर प्रिंट रिपोर्टमध्येही ज्या पेनने सुसाइड नोट लिहिले त्यावर, गनवर, टेबलवरील पॅडवर किंवा इतर ठिकाणी इतरांचे फिंगर प्रिंट आढळलेले नाहीत. सुत्रांच्या मते, महाराजांबरोबर राहणाऱ्यांनी त्यांचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ तयार केलेले होते. त्यामुळेही महाराज तणावात असायचे.

 

निनावी पत्रात महत्त्वाची माहिती
पोलिसांना मिळालेल्या निनावी पक्षात महाराजांबाबत अनेक महत्त्वाची माहिती आहे. महाराजांना काय आवडायचे काय नाही, इथपासून त्यांचे आणि आयुषी यांचे संबंध असे उल्लेख त्यात आहे. आयुषी महाराजांवर हुकूम गाजवत होत्या असा उल्लेखही पत्रात आला आहे. पत्रात अशाही काही प्रसंगांचा उल्लेख आहे, ज्यानंतर महाराजांना सेवादारांसमोर जायलाही लाज वाटायची.

 

...तर कारवाई करता येईल.
पोलिस तपासामध्ये महाराजांच्या नीकटवर्तीयाने दिलेल्या माहितीचा समावेश कऱणार असल्याची माहिती मिळाली आहे. एखाद्याने पोलिसांना समोर येऊन माहिती दिली तर, महाराजांचा अपमान करून त्यांचा तणाव वाढवणाऱ्यांवर कारवाई करता येईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, या प्रकरणाशी संबंधित आणखी काही Photos...  
 

बातम्या आणखी आहेत...