आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Suicide Mystery: आधी फोन, आता पोलिसांना निनावी चिठ्ठी; आपल्या मर्जीने कुणाशी बोलूही शकत नव्हते भय्यू महाराज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंदूर- स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केलेल्या भय्यू महाराजांसंदर्भात गुरुवारी पोलिस उपमहानिरीक्षकांकडे अज्ञात व्यक्तीने १५ पानी निनावी पत्र पाठवले आहे. यात भय्यू महाराज आणि त्यांच्या कुटुंबासंबंधी काही माहिती देण्यात आली आहे. पत्र पाठवणारी व्यक्ती कुटुंबातील सदस्य अथवा सेवेकरी असावी, असा पोलिसांना संशय आहे. पोलिस महानिरीक्षक हरिनारायणाचारी मिश्र यांनी सांगितले, या पत्रातील माहिती पडताळली जाईल. दरम्यान, भय्यू महाराजांनी लिहिलेल्या सुसाइड नोटच्या हस्ताक्षराची तज्ज्ञांकडून तपासणी केली जात आहे. महाराजांच्या व्हिसेराचा अहवाल अद्याप मिळालेला नाही. परंतु त्यांच्या शरीरात नशेचे पदार्थ आढळले नाहीत. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पत्रातील मुद्दे 
- दुसरे लग्न केल्यानंतर भय्यू महाराज तणावाखाली आले होते. पत्नी आयुषी व मुलगी कुहू यांच्यात दररोज वाद व भांडणे होत असत. या दोघींच्या भांडणात महाराजांची कोंडी होत होती. दोघींची समजूत काढण्याचा ते प्रयत्न करत असत. पण त्यातून मार्ग काही निघाला नाही. 
- कौटुंबिक वाद वाढत चालल्याने महाराजांनी सुरू केलेले सामाजिक सेवेचे कार्य थांबले होते. काम थांबवल्याने आणि तणावाखाली असल्याने ते अनेकदा आजारी पडले. त्यांना रुग्णालयात जावे लागले. 
- एकांतवासासाठी पुण्यातील आश्रमात भय्यू महाराज काही काळ वास्तव्यास गेले होते. परंतु आयुषी त्यांना सतत फोन करत होती. 
- आयुषीच्या माहेरच्या लोकांचा हस्तक्षेप महाराजांच्या आश्रम व कुटुंबातील व्यवहारात वाढला होता. आयुषीचे काका व भाऊ यांचा महाराजांना त्रास होत असे. या दोघांमुळेही त्यांचा तणाव वाढलेला होता. 


या पत्रात असेही म्हटले आहे की, आयुषीने भय्यू महाराजांना त्यांच्या कुटुंबियापासून तोडले आहे. त्यानंतर या अाश्रमात काम करण्यासाठी आयुषीने तिच्या भावास व काकाला बोलावून घेतले होते. महाराजांच्या मनात कुहूविषयी दुरावा निर्माण करण्याचा आयुषीने प्रयत्न केला होता. भय्यू महाराजाकडून पहिल्या पत्नीचा उल्लेख जरी झाला तर आयुषीच्या रागाचा भडका उडत होता. पहिल्या पत्नीचे घरातील सर्व छायाचित्रे आयुषीने काढून टाकली होती. इतकेच नव्हे तर कुहूशी बोलण्यासही महाराजाना मनाई केली जात हाेती. त्यामुळे कुहूला व इतर नातेवाइकांशी भय्यू महाराजांना लपून छपून बोलणी करावी लागत असत. आयुषीचा भाऊ अभिनव व काका उमेश शर्मा आश्रमातून पगार घेत असत. गेल्या दोन वर्षापासून महाराजांचा तणाव वाढत चालला होता आणि डॉ. अायुषीसोबत लग्न केल्यानंतर ते एकाकी व असहाय पडले होते, असा उल्लेख या पत्रात करण्यात आला आहे. 

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, संबंधित आणखी Photos...       

बातम्या आणखी आहेत...