आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • BJP नेत्याच्या मुलाचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार BJP Leader Son With Minor Girl Obscene Video Viral

BJP नेत्याच्या मुलाचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार, आधी कारमध्ये फिरवले मग नेले हॉटेलमध्ये

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डेमो फोटो.. - Divya Marathi
डेमो फोटो..

झाबुआ(एमपी) - BJP नेते गंभीरमल राठी यांचा मुलगा संदीप राठी (45) याने 10 दिवसांपूर्वी झाबुआ बसस्टँडच्या मागे असलेल्या एका हॉटेलवर 17 वर्षीय अल्पवयीन मुलीशी शारीरिक संबंध बनवून त्याचा आपल्या मोबाइलमध्ये व्हिडिओ बनवला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर रविवारी रात्री किशोरवयीन मुलीने पोलिसांत धाव घेऊन     गुन्हा दाखल केला.

 

आरोपी मुलीची वाट अडवून म्हणाला- मी तुझ्यावर खूप प्रेम करतो 

- आरोपी संदीप पोलिसांना सांगत होता की, त्याने त्याचा मोबाइल बिघडल्याने तो दुरुस्त करण्यासाठी दिला होता, यानंतर हा व्हिडिओ व्हायरल झाला.
- राणापूर येथील आदिवासी अल्पवयीन मुलगी रविवारी रात्री गल्लीतील रहिवाशांसह पोलिस स्टेशनमध्ये तक्रार देण्यासाठी आली होती.
- रात्री 11 वाजता पोलिसांनी तक्रार दाखल केली. अल्पवयीन मुलगी म्हणाली की, ती हर्षवर्धन ठाकूर यांच्या घरी झाडलोट करण्याचे काम करते.
- दररोज ती शिवाजी चौकातून कामावर जायची. 10 दिवसांपूर्वी संदीप राठीने तिची वाट अडवून म्हणाला की, तो तिला पसंत करतो, तिच्यावर खूप प्रेम करतो.
- 16 मे रोजी दुपारी 2 वाजता संदीपने तिला राणापुर नगर पंचायतीच्या समोर कारमध्ये बसवले. म्हणाला की, फिरवून आणतो.
- तिला झाबुआ बस स्टँडच्या हॉटेलमध्ये नेऊन लैंगिक शोषण करण्यात आले आणि व्हिडिओ बनवण्यात आला. दोन तासांनंतर 4 वाजता राणापुरमध्ये झाबुआ नाक्यावर कारमधून उतरवून निघून गेला.
- दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला. अल्पवयीन मुलीचे कुटुंबीय रविवारी रात्री तक्रार दाखल करण्यासाठी जात होते, तेव्हा संदीपने त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. 
- ते ऐकले नाही म्हणून संदीपही त्यांच्यासोबत पोलिस स्टेशनमध्ये आला. तो म्हणत होता की, मोबाइल दुरुस्त करण्यासाठी दिला होता, तेथून हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
- मुलीच्या कुटुंबीयांची समजूत काढण्याचे खूप प्रयत्न करण्यात आले, परंतु ते बधले नाहीत. रात्री 11 वाजता पोलिसांनी संदीपविरुद्ध एसटी-एससी अॅक्ट, पॉक्सो अॅक्ट यासह बलात्काराच्या कलमामध्ये गुन्हा दाखल करून आरोपीला ताब्यात घेतले.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, संबंधित आणखी फोटोज... 

 

बातम्या आणखी आहेत...