आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • BJP विधानसभा लोकसभेची तयारी एकत्र करणार Bjp Plan For Election

BJP विधानसभा-लोकसभेची तयारी एकत्र करणार, अमित शहा मंगळवारी देणार निवडणूक रोडमॅपला मंजूरी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळ - विधानसभा निवडणुकीसोबत लोकसभा निवडणुकीसाठीही भाजपने प्रबंधन समिती तयार केली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा मंगळवारी (12 जून) राज्याची पहिली बैठक घेणार आहेत. यामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या नेतृत्वात तयार करण्यात आलेल्या निवडणूक समितीमध्ये आणखी तीन सदस्यांची भर घालण्यात आली आहे. यामध्ये संघटन महामंत्री अतुल राय, प्रदेश उपाध्यक्ष, विजेश लुनावत आणि विनोद गोटिया यांचा समावेश करण्यात आला आहे. 

 

विधानसभा-लोकसभा निवडणुकीची तयारी एकत्र 
- पक्षाच्या सूत्रांनी म्हटले आहे, की लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या समितीच्या बैठकीसाठी अमित शहा येणार आहेत. दोन्ही निवडणुकीची रणनीती ते निश्चित करणार आहेत. 
- शहांची इच्छा आहे की दोन्ही निवडणुकांची तयारी एकत्रीत केली जावे. पक्षात अशी चर्चा आहे की येत्या नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये मध्यप्रदेशसह चार राज्यांच्या विधानसभा निवडणुका आहेत. यासोबतच लोकसभा निवडणुक घेण्याची पक्षांतर्गत चर्चा सुरु आहे. 
- यावर एकमत झाले तर दोन्ही निवडणुकांची एकत्रित तयारी केली जाणार आहे. त्यासाठी निवडणुकांची घोषणा होण्यापूर्वीच समिती स्थापन करुन भाजप कार्यकर्त्यांना सक्रिय करण्याची तयारी आहे. 
- दरम्यान, अमित शहा निवडणूक समितीसोबत मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, नरेंद्रसिंह तोमर, प्रदेशाध्यक्ष राकेश सिंह आणि संघटन महामंत्री सुहास भगत यांच्याकडून शेतकरी आंदोलनाबद्दलची माहिती घेणार आहेत. 
- अमित शहांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी होणारी कॅबिनेटची बैठक रद्द करण्यात आली आहे. ही बैठक आता 15 जून रोजी होणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...