आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अाध्यात्मिक संत भय्यूजी महाराज यांच्या पार्थिवावर आज इंदूर मधील मुक्तिधाम येथे अंत्यसंस्कार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

> अाध्यात्मिक संत भय्यूजी महाराज यांच्या पार्थिवावर आज इंदूर येथील राहत्या घरी होणार अंत्यसंस्कार.

> सकाळी ९ ते दुपारी १२:३० पर्यंत पार्थिवाचे अंत्यदर्शन 

दुपारी १ वाजता इंदूर मधील मुक्तिधाम येथे अंत्यसंस्कार 

इंदूर - अाध्यात्मिक संत भय्यूजी महाराज (५०) यांनी मध्य प्रदेशातील इंदुरात स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. मंगळवारी अाधी त्यांनी मुलीच्या खोलीत जाऊन स्वत:ला बंद केले. यानंतर परवानाप्राप्त रिव्हाॅल्व्हरने स्वत:च्या कानशिलावर गोळी झाडली. ती डोक्यातून आरपार निघाली. 


आत्महत्येपूर्वी त्यांनी आपल्या पॉकेट डायरीत दीड पानांची चिठ्ठी लिहून ठेवली आहे. त्यात ‘कौटुंबिक जबाबदारी सांभाळण्यासाठी येथे कुणीतरी असावे.’ मी खूप तणावात आहे. थकलोय, यामुळे सोडून जातोय’, असे लिहिले आहे. सेवेकरी विनायक यांना मृत्यूनंतरच्या सर्व जबाबदाऱ्या सोपवण्याचाही उल्लेख आहे. 


पोलिसांच्या प्राथमिक तपासात कौटुंबिक वादामुळे तणावाखाली येऊन आत्महत्या केल्याचे समोर येत आहे. तथापि, अद्याप आत्महत्येचे मूळ कारण समोर आलेले नाही. पोलिस महासंचालक हरिनारायणचारी मिश्र यांनी सांगितले की, घटना इंदुरातील सिल्व्हर स्प्रिंग टाऊनशिपमध्ये झाली. भय्यू महाराज ऊर्फ उदयसिंह देशमुख यांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. घटनेच्या वेळी घरात त्यांची आई, सेवक विनायक व योगेश हे होते. पत्नी आयुषी बाहेर गेल्या होत्या. दुपारी १२ वाजेच्या सुमारास त्या परतल्यानंतर घटना समाेर आली. रिव्हॉल्व्हर त्यांच्या बाजूला पडलेले होते व डोक्यातून रक्त वाहत होते. 


नेहमीप्रमाणे सकाळी उठले, योगासने, पूजा केली अन्...

गुरुजी नेहमीप्रमाणे उठले. योगा केला. पूजेनंतर त्यांनी फणसाची भाजी खाण्याची इच्छा व्यक्त केली. मी ती बनवली. जेवण करून ते खोलीत आराम करण्यास गेल्याचे नोकराने सांगितले. मी अनेक खोल्यांमध्ये जाऊन पाहिले. पण गुरुजी दिसले नाहीत. मी थोडी चिंतित झाले. बाथरूममध्येही शोधले. नंतर नेहमी बंद राहणाऱ्या खोलीत जाऊन पाहण्याचा प्रयत्न केला. दरवाजा आतून बंद होता. दरवाजा वाजवला पण काही प्रतिसाद मिळाला नाही. ओरडून नोकरांना बोलावून घेतले. दरवाजा तोडण्यास सांगितले. तीन ते चार धक्के मारल्यानंतर दरवाजा तुटला. महाराजांचे डोळे फिरलेले होते आणि रक्ताच्या थारोळ्यात ते निपचित पडले होते. माझा घसा कोरडा पडला आणि आवाजही निघत नव्हता. शेवटी वाहनातून त्यांना रुग्णालयाकडे घेऊन आम्ही निघालो. 

 

>पहिल्या पत्नीची मुलगी कुहू म्हणाली, सावत्र आईमुळेच हे घडले, तिला अटक करा

मुलगी कुहू : मी त्यांना (डॉ. आयुषी) माझी आई समजत नाही. त्यांच्यामुळे बाबांनी हे पाऊल उचलले. त्यांना तुरुंगात डांबून ठेवा. 

 

पत्नी आयुषी : कुहूला मी व माझी कन्या आवडत नव्हती. कुहू येथे राहणार होती. यामुळे मुलीचा जन्म होताच मी माझ्या आईकडे राहायला गेले. कुहू पुण्याला गेल्याच्या काही दिवसांआधीच मी इंदूरला आले. भय्यूजी माझ्या व कुहूसोबत चांगले राहत होते.

 

नोकर : महाराजांचेे मुलीवर खूप प्रेम होते. प्रत्येक गोष्टीत ते मुलीची बाजू घ्यायचे. यावरून त्यांच्यात वादही व्हायचे. यामुळे ते तणावातच असत.

 

>या मुद्द्यांवर पोलिसांचा तपास : गृहकलह, संपत्तीचा वाद की घोटाळ्याची कागदपत्रे

 

१  भय्यू महाराज अनेक दिवसांपासून गृहकलहामुळे तणावात होते. पत्नी आयुषीसोबत त्यांच्या वादाच्या मुद्द्यावर पोलिस तपास करत आहेत. सूत्रांनुसार, दुसऱ्या विवाहानंतर त्यांच्या आयुष्यात पत्नीचा हस्तक्षेप खूप वाढला होता. यामुळे बऱ्याच वेळा तणावात राहत. अनेकदा त्यांच्यात कुरबुरी झाल्या होत्या.

 

२  पहिल्या पत्नीपासून झालेल्या कुहू या मुलीवर भय्यूजी खूप प्रेम करायचे. दुसऱ्या लग्नानंतर कुहू ही अंतर राखून होती. तिचे आयुषीसोबत चांगले संबंध नसल्याचे सांगितले जाते. कुहू मंगळवारीच पुण्याहून इंदूरला आली होती. तिला आणण्यासाठी भय्यूजींनी कार पाठवली. मात्र ती येण्याआधीच आत्महत्या केली.

 

  भय्यू महाराज यांच्या घरी आलेल्या काही महिला अनुयायांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, ते ५० लाख रुपयांच्या प्रॉपर्टीचा वाद आणि कौटुंबिक कलहामुळे प्रचंड तणावाखाली होते.

 

४  सूत्रांनुसार, भय्यूजींकडे मुख्यमंत्री चौहान यांच्या ६०० कोटींच्या वृक्ष लागवडीतील घोटाळ्याची कागदपत्रे पुराव्यांसह आली होती. त्यांनी चौहान यांच्याशी चर्चाही केली होती. मात्र तेव्हापासून ते तणावात होते.

 

दोन वर्षांपूर्वी दुसरा विवाह, १८ वर्षांची मुलगी पुण्यात

भय्यूजी महाराज यांचा पहिला विवाह मूळ उस्मानाबादच्या माधवी निंबाळकर यांच्याशी झाला होता. नंतर त्यांचे कुटुंबीय औरंगाबादेत स्थायिक झाले. भय्यूजी महाराज यांना १८ वर्षांची कुहू ही कन्या असून ती पुण्यात शिकत आहे. माधवी यांचे २०१५ मध्ये निधन झाले होते. भय्यूजी यांनी २०१६ मध्ये शिवपुरी येथील डॉक्टर आयुषी शर्मा यांच्याशी दुसरा विवाह केला होता.

 

पुढील स्लाईडवर क्लिक करून पहा, दीड पानाची सुसाइड नोट...

 

(दुसऱ्या लग्नाचा Wedding Album पाहण्यासाठी इथे क्लिक करा..)

 

बातम्या आणखी आहेत...