आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • मोठी बातमी: भय्यूजी महाराजांनी स्वत:वर गोळी झाडून केली आत्महत्या; पन्नाशीत दुसरे लग्न, अशी होती Breaking News Bhayyuji Maharaj Sucide In Mp Latest News And Updates

भय्यूजी महाराजांनी केली आत्महत्या; पन्नाशीत दुसरे लग्न, अशी होती LIFE

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंदूर/भोपाल - भय्यूजी महाराज यांनी आज दुपारी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांना इंदुरातील बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले. संपूर्ण भारतात आपल्या सामाजिक कार्याने वेगळी ओळख निर्माण करणारे भय्यू महाराज यांना मॉडर्न आणि राष्ट्रीय संत म्हटले जाते. त्यांनी 49 वर्षे वयात दुसरे लग्न केले होते. वास्तविक, त्यांच्या पहिल्या पत्नीचे निधन झाल्यानंतर मुलगी कुहू आणि आईची काळजी घेण्यासाठी त्यांनी हे लग्न केले होते.  

 

अशी आहे त्यांची पर्सनल लाइफ...
- 1968 मध्ये जन्मलेल्या भय्यू महाराजांचे खरे नाव उदयसिंह देखमुख असे होते. ते शुजालपूरच्या जमीनदार कुटुंबातील होते.
- कधीकाळी कपड्यांच्या एका ब्रँडसाठी अॅडमध्ये मॉडेलिंग करणारे भय्यू महाराज नंतर गृहस्थ संत बनले. सदगुरू दत्त धार्मिक ट्रस्ट त्यांच्या देखरेखीत सुरू होती.
- त्यांचे मुख्य आश्रम इंदूरच्या बापट चौकात आहे. त्यांच्या पत्नी माधवी यांचे दोन वर्षांपूर्वी निधन झालेले आहे.
- पहिल्या लग्नानंर त्यांना एक मुलगी कुहू आहे, ती पुण्यात राहून शिक्षण घेते.
- त्यांनी 30 एप्रिल 2017 रोजी एमपीच्या शिवपुरीच्या रहिवासी डॉ. आयुषी यांच्याशी विवाह केला. 
- मर्सिडीझसारख्या महागड्या गाड्या चालवणारे भय्यूजी रोलेक्स ब्रँडची घड्याळ घालत आणि आलिशान बिल्डिंगमध्ये राहत.

 

हायप्रोफाइल व्यक्तींशी संबंध
- ते पहिल्यांदा चर्चेत तेव्हा आले, जेव्हा अण्णा हजार यांचे उपोषण सोडवण्यासाठी तत्कालीन केंद्र सरकारने त्यांना आपले दूत बनवून पाठवले होते. यानंतर अण्णांनी त्यांच्या हातून ज्यूस पिऊन उपोषण सोडले होते.
- पीएम बनण्याआधी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांच्या रूपात मोदींचा सद्भावना उपवास सुरू होता, तेव्हा उपवास सोडण्यासाठी त्यांनी भय्यू महाराजांना आमंत्रित केले होते.
- माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, पीएम नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे माजी सीएम दिवंगत विलासराव देखमुख, शरद पवार, लता मंगेशकर, उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे, आशा भोसले, अनुराधा पौडवाल, अभिनेता मिलिंद गुणाजीही त्यांच्या आश्रमात येऊन गेलेले आहेत.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, राष्ट्रसंत भय्युजी महाराज यांचे आणखी काही फोटोज...  

बातम्या आणखी आहेत...