आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • BREAKING: भय्यू महाराजांच्या मित्राचा डीआयजींना फोन, म्हणाला मी सांगू शकतो आत्महत्येचे कारण Breaking News In Bhaiyyu Ji Maharaj Suicide Case

भय्यू महाराजांच्या मित्राचा डीआयजींना फोन, म्हणाला- मी सांगू शकतो आत्महत्येचे कारण, जबाब नोंदवणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंदूर - भय्यू महाराजांच्या आत्महत्येप्रकरणी मोठा खुलासा झाला आहे. सूत्रांनुसार, भय्यू महाराजांच्या जवळच्या मित्राने मंगळवारी डीआयजींना केला केला. तो म्हणाला की, त्याला आत्महत्येच्या कारणांबाबत काही गोष्टी सांगायच्या आहेत. डीआयजींनी त्याला भेटण्यासाठी बोलावले असून त्याचाही जबाब नोंदवला जाणार आहे.

तथापि, पोलिसांना हे कळून चुकले आहे की, महाराजांचे कुटुंबीय आणि सेवेकरी आत्महत्येचे खरे कारण लपवत आहेत. त्यांनी तणावाचे कारण सांगून अंग झटकण्याचा प्रयत्न केला आहे. पोलिस मुख्य कारणांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासंबंधीच मंगळवारी भय्यू महाराजांच्या एका जवळच्या मित्राचा डीआयजींना फोन आला होता.

 

अद्याप कुणालाही क्लीन चिट नाही...

भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणात 90 टक्के तपास पूर्ण झाला आहे. आता त्यांच्या व्हिसेरा आणि रिव्हॉल्व्हरची फॉरेंसिक रिपोर्टची प्रतीक्षा केली जात आहे. दोन्ही अहवाल आल्यानंतर महाराजांच्या आत्महत्येमागे कोण दोषी आहे हे निश्चित होईल, असे सूत्रांनी सांगितले. भय्यू महाराज (उदयसिंह देशमुख) यांनी 12 जून रोजी इंदुरातील आपल्या बंगल्यात गोळी झाडून आत्महत्या केली होती. याप्रकरणी सीएसपी (खजराना) मनोज रत्नाकर यांना तपास देण्यात आला. त्यांनी पत्नी, कन्या, आश्रम, नातेवाईक आणि सेवेकरी, डॉक्टरांशी संबंधित एकूण 25 जणांचे जबाब नोंदवले आहेत.

 

व्हिसेराचा रिपोर्ट आल्यावर ठरणार दोषी कोण?

सूत्रांनुसार, काही जण म्हणाले की, महाराज पत्नी डॉ. आयुषी आणि कन्या कुहूमध्ये सुरू असलेल्या वादामुळे तणावात होते, दुसरीकडे काहींनी ढासळलेली आर्थिक परिस्थिती आणि कर्जाचे कारण सांगितले आहे. तपास अधिकारी म्हणतात- तपास अजूनही सुरू आहे. यामुळे पोलिसांनी कुणालाही क्लीन चिट दिलेली नाही. महाराजांना कोणत्या गोष्टीचा तणाव होता, या कारणाच्या मुळापर्यंत जाऊ. एखाद्याला आरोपीही केले जाऊ शकते. सध्या हँडरायटिंग, व्हिसेरा आणि रिव्हॉल्व्हरचा रिपोर्ट येणे बाकी आहे. 

 

यांचे नोंदवले जबाब
कुहू (कन्या), डॉ. आयुषी (पत्नी), कुमुदिनी (आई), सरोज सोळंकी, गोलू ऊर्फ गोल्डू (नोकर), योगेश देशमुख, शरद शर्मा, प्रवीण देशमुख, राजेंद्र पवार, अमोल चव्हाण, शरद पवार, संजय यादव, तुषार पाटील (सेवेकरी तसेच ट्रस्ट पदाधिकारी), मनमित अरोरा (कन्स्ट्रक्शन व्यावसायिक), राजा ऊर्फ निवेश बडजात्या (वकील), मधुमती ऊर्फ रेणू पाटील, प्रदीप पाटील, आराधना पाटील, अनिल पाटील (बहीण आणि मेहुणे), मनोहर सोनी (मित्र), दिलीप देशमुख व अरुण देशमुख (भाऊ), डॉ. विनोद पोरवाल, डॉ. त्रिवेदी व इतर.


पोलिसांची दिशाभूल, कॉल डिटेलवरून शोधले जातेय गूढ
एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, काही जणांच्या इशाऱ्यावरून सेवेकरी आणि ट्रस्टी पोलिसांची दिशाभूल करत आहेत. आम्ही कॉल डिटेल समोर ठेवल्यावर उत्तर देण्याचे टाळू लागले. आधी ते लिहिण्यात आले जे त्यांनी सांगितले. आता त्यांचे जबाब क्रॉस चेक केले जात आहेत. यावरून खरे-खोटे काय ते समोर येईल.

 

सेवेकरी-नोकरांकडून भय्यूजींवर पाळत ठेवू लागली होती पत्नी आणि कन्या
पत्नी आणि कन्येतील वादात अडकलेल्या भय्यू महाराजांवर त्यांचेच सेवेकरी आणि नोकर पाळत ठेवू लागले होते. यासाठी त्यांची पत्नी आणि कन्याही सेवेकरी व नोकरांवर दबाव टाकत होत्या. कन्या हे शोधण्याचा प्रयत्न करत होती, वडील दुसऱ्या पत्नीसाठी काय करत आहेत, तर पत्नी आयुषींना हे जाणून घ्यायचे होते की, भय्यूजी आणि कन्येत काय-काय बोलणे होते. हा खुलासा भय्यू महाराजांचे नोकर आणि सेवेकऱ्यांच्या जबाबावरून झाला आहे.


आश्रमावर संकट
भय्यू महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांची हजारो कोटींची संपत्ती असल्याचे दावे केले जात आहेत. तथापि, सद्गुरू दत्त धार्मिक आणि पारमार्थिक ट्रस्टच्या समोर देशातील वेगवेगळ्या स्थानांवर असलेल्या 11 आश्रम आणि 20 मोठ्या योजनांच्या कार्यान्वयनाचे मोठे आव्हान आहे. ट्रस्टची आर्थिक स्थिती चांगली नसल्याचे भय्यू महाराजांनी दीड वर्षांपूर्वीच जाहीर केले होते. यामुळे त्यांच्या आत्महत्येच्या पावलामुळे परिस्थिती आणखीनच बिकट बनली आहे. दुसरीकडे संत भय्यू महाराजांच्या मृत्यूनंतर पोलिसांनी 7 दिवसांत 20 हून अधिक जणांचे जबाब नोंदवले होते. परंतु कारणे अजूनही गुलदस्त्यात आहेत. महाराजांशी संबंधित व्यक्तींनी पोलिसांच्या तपासावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ते म्हणतात की, भय्यूजी महाराजांना सारखे कॉल करणाऱ्या काही व्यक्तींची चौकशी करण्याचे पोलिस टाळत आहेत.


हॉस्पिटलचे बिल देण्यासाठी लोकांकडून उधार मागावे लागले पैसे
भय्यूजी महाराजांच्या हजारो कोटींच्या संपत्तीसाठी आता वादाची स्थिती उद्भवली आहे. या समस्येच्या समाधानासाठी नवनवे फॉर्म्युले समोर येत आहेत. महाराजांच्या आजारपणादरम्यान काही महिन्यांपूर्वी हॉस्पिटलचे बिल देण्यासाठी अडचणी आल्या. कन्या कुहूला शिक्षणासाठी इंग्लंडला पाठवण्यासाठीही त्यांनी नेहमी आश्रमात येणाऱ्या मुंबईच्या एक प्रसिद्ध गायिका आणि काही उद्योगपतींना आर्थिक मदत मागितली होती.
सूत्रांनुसार, अशीही चर्चा आहे की, भय्यू महाराज आर्थिक अडचणींचा सामना करत होते. त्यांनी काही दिवसांपूर्वीच 10 लाख रुपयांचेही कर्जही घेतले होते. काही उद्योगपती आणि आश्रमात नेहमी येणाऱ्या प्रसिद्ध गायिकेलाही उधार पैसे मागितले होते. असे सांगतात की, महिनाभरापूर्वी खासगी हॉस्पिटलचे बिल देण्यासाठीही त्यांना पैसे कमी पडले होते.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, संबंधित आणखी Photos...   

बातम्या आणखी आहेत...