आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी दागिने घेऊन नवरी फरार, व्हॉट्सअॅपवर पाठवला दुसऱ्या लग्नाचा फोटो

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सारनी (भोपाळ) - एका नवरीने लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी माहेरी आल्यानंतर प्रियकरासह पळून जाऊन दुसरे लग्न केले. सूत्रांनुसार, तरुणीचे लग्न भोपाळच्या नजीक इटारसीमध्ये झाले होते. परंतु तिला हे लग्न मंजूर नव्हते. तथापि, आधीच्या सासरच्यांनी तरुणीवर रोख रक्कम आणि दागिने घेऊन पळून गेल्याचा आरोप केला आहे. सोबतच लग्नात जोही खर्च झाला होता तो परत करण्यासाठी पोलिसांना अर्ज दिला आहे.   

 

असे आहे प्रकरण...
- नवरीचे नाव संजना खातरकर असून ती पाथाखेडा (सारनी) ची रहिवासी आहे.
- संजनाचे लग्न 28 फेब्रुवारी 2018 रोजी इटारसीच्या तवानगरमध्ये राहणाऱ्या नीतेश नागलेशी झाले होते.
- लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरी जेव्हा माहेरी आली तेव्हा तिने आपल्या प्रियकरासह पळून जाऊन दुसरे लग्न केले. 
- यानंतर तरुणीने प्रियकरासोबत झालेल्या लग्नाचा फोटो व्हॉट्सअॅपवर पतीसह इतर सर्वांना पाठवला. यानंतरच सर्वांना त्यांच्या लग्नाबाबत माहिती मिळाली.

 

असे कळले सासरच्यांना सुनेने केले दुसरे लग्न...
- पाथाखेड़ा इन्चार्ज नितीन पाल म्हणाले की, नागले कुटुंबाने आपल्या सुनेवर दागिने घेऊन पळून गेल्याचा आरोप केला आहे.
- तक्रारीत लिहिले आहे की, 28 फेब्रुवारी रोजी दोघांचे लग्न झाले होते आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी संजना दागिने आणि रोख रक्कम घेऊन पळून गेली.
- काही दिवसांनंतर सासरच्यांना संजनाबाबत कळले की, तिने दुसरे लग्न केले आहे.
- तरुणीच्या सासरच्यांनी लग्नात झालेला खर्च पाहता SDOP पंकज दीक्षित यांच्याशी संपर्क केला आणि त्यांना पूर्ण प्रकरण सांगितले.
- मग सासरच्यांनी संबंधित पोलिस स्टेशनमध्ये अर्ज देऊन कारवाईची मागणी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...