आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्योगाची किल्ली घेऊन विसरले मुख्यमंत्री, भाजप राजमध्ये उद्योगधंद्यांना आले \'बुरे दिन\'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळ - मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या सरकारमध्ये उद्योगधंद्यांना "बुरे दिन" आले आहेत. तरुण उद्योजकांना सरकारच्या योजनांचा लाभ मिळत नाहीये. यामुळे त्यांना आपल्या उद्योगांना टाळे ठोकावे लागत आहे. अशीच घटना मध्यप्रदेशच्या सिवनी जिल्ह्यातील आहे. येथे सरकारच्या लालफीतशाहीमुळे त्रस्त होऊन एका महिला उद्योजिकेला आपल्या प्लांटला टाळे लावावे लागले, एवढेच नाही तर त्यांनी कुलूपाची किल्लीही मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना सोपवली. यानंतरही ना सरकारला जाग आली, ना सरकारी अधिकाऱ्यांना... 

या सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे मुख्यमंत्री शिवराज हे किल्ली घेऊन विसरूनही गेले. महिला उद्योजिका दीपमाला नंदन आधी सरकारी योजनांचा लाभ मिळत नसल्याने त्रस्त होत्या, आता आपल्या प्लांटची किल्ली परत घेण्यासाठी त्यांना दारोदार भटकावे लागत आहे.

 

असे आहे प्रकरण...

वास्तविक, सिवनी येथील रहिवासी महिला उद्योजिका दीपमाला विजय नंदन यांचा नागपूर रोडवर खेरीटेकमध्ये बॅटरी निर्मितीचा प्लांट आहे. हा प्लांट त्यांनी 2015 मध्ये मुख्यमंत्री युवा उद्योजक योजनेतून 25 लाख रुपयांचे कर्ज घेऊन सुरू केला होता. वर्षभरानंतर त्यांना बॅटरीच्या वाढलेल्या मागणीमुळे ती पूर्ण करण्यासाठी तब्बल 15 लाख रुपयांच्या वर्किंग कॅपिटल कर्जाची आवश्यकता पडली. यासाठी त्यांनी मध्य प्रदेश ग्रामीण बँकेशी संपर्क केला. तेव्हा बँक अधिकाऱ्यांनी वर्किंग कॅपिटल कर्ज देण्यासाठी संमती दर्शवली. परंतु लगातार अर्ज करूनही बँक अधिकाऱ्यांनी आजपर्यंत कर्जाला स्वीकृती दिली नाही. तथापि, बँकेने आधीच महिला उद्योजिकेची तब्बल 80 लाख रुपये किमतीची प्रॉपर्टी आपल्याकडे गहाण ठेवलेली आहे.

 

त्रस्त होऊनच सोपवली होती किल्ली...
गत वर्षभरापासून वर्किंग कॅपिटलसाठी त्रस्त झालेल्या महिला उद्योजिकेने शेवटी आपल्या प्लांटला टाळे ठोकले आणि 12 जानेवारीला छिंदवाडाच्या हवाई पट्टीवर मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना अर्जासह प्लांटची किल्ली सोपवली. महिला उद्योजिका म्हणाल्या की, मुख्यमंत्र्यांना किल्ली सोपवण्याचा उद्देश हाच होता की, त्यांनी माझी समस्या गांभीर्याने घ्यावी आणि निराकरण करून मला किल्ली सोपवावी. परंतु असे काही झाले नाही.

 

दीड महिन्यापासून बंद आहे प्लांट...
यानंतर महिला उद्योजिकेने जिल्हा कलेक्टरसहित मुख्यमंत्री शिवराज यांना 2 वेळा अर्ज-निवेदन दिलेले आहे. त्यांच्या प्लांटची एकच किल्ली होती, यामुळे प्लांट 12 जानेवारीपासून बंद आहे. प्लांटमधील एक डझनाहून जास्त कामगार बेरोजगार झाले आहेत. किल्ली परत मिळवण्यासाठी महिला उद्योजिकेने छिंदवाडा कलेक्टरपासून ते मुख्यमंत्री निवासापर्यंत संपर्क केला, परंतु त्यांना किल्ली काही परत मिळाली नाही. यावरून अंदाज येऊ शकतो की, सरकारी सिस्टमच जेव्हा एवढी बेजबाबदार असेल तेव्हा कुठे आणि कुणाकडे न्यायाची अपेक्षा करावी. न्यायाच्या अपेक्षेने मुख्यमंत्र्यांना किल्ली सोपवणारी महिला उद्योजिका आता म्हणत आहे की, भाजप राजमध्ये "अच्छे दिन" एक खूप चांगला "जुमला" आहे. 

 

काय म्हणतात जबाबदार?

> महिला उद्योजिकेचे वर्किंग केपिटल कर्जाची प्रक्रिया सुरू आहे. मी फाइल तयार करून वरिष्ठांना पाठवलेली आहे.
- एस. के. अवस्थी, मॅनेजर, सेंट्रल म. प्र. ग्रामीण बँक, सिवनी.

> मला किल्लीबाबत माहिती मिळाली होती, मी त्याबाबत चौकशी केली, परंतु अजून मिळाली नाही.
- अजय तिर्की, डेप्युप्टी कलेक्टर, छिंदवाडा

> किल्लीबद्दल मुख्यमंत्री निवासातून फोन आला होता. आम्ही येथे शोध घेतला, परंतु आढळली नाही.
- राजेश साही, एसडीएम, छिंदवाडा.

 

काय म्हणते महिला उद्योजिका...
मी वर्षभरापासून बँकेला वर्किंग कॅपिटल लोनची मागणी केलेली आहे. आजपर्यंत कोणतेही समाधानकारक उत्तर आलेले नाही. मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा होती, परंतु ते किल्ली घेऊन सरळ विसरून गेले. कमीत कमी मला माझी किल्ली तरी परत करावी, जेणेकरून मला माझा प्लांट यथास्थिती सुरू करता येईल.
- दीपमाला नंदन, महिला उद्योजिका, सिवनी.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, संबंधित आणखी फोटो...

बातम्या आणखी आहेत...