आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • धक्कादायक: कॉन्स्टेबल भरतीवेळी पुरुष महिला उमेदवारांचे अर्धनग्नावस्थेत एकाच रूममध्ये चेकअप Constable Recruitment: Semi Nude Checkup In The Same Room In The Bhind, The Women And Men Dressed Together And Examined

धक्कादायक: कॉन्स्टेबल भरतीवेळी पुरुष-महिला उमेदवारांचे अर्धनग्नावस्थेत एकाच रूममध्ये चेकअप

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महिला व पुरुष उमेदवारांचे एका रूममध्ये मेडिकल चेकअप झाल्याने सिव्हिल सर्जन यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. - Divya Marathi
महिला व पुरुष उमेदवारांचे एका रूममध्ये मेडिकल चेकअप झाल्याने सिव्हिल सर्जन यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

भिंड - मध्य प्रदेशात पुन्हा एकदा आरोग्य विभागाच्या बेजबाबदारपणाचे एक प्रकरण समोर आले आहे. येथे कॉन्स्टेबल भरतीदरम्यान महिलांचे मेडिकल चेकअप पुरुष डॉक्टरांनी केले. एवढेच नाही, महिला आणि पुरुष उमेदवारांचे चेकअप अर्धनग्नावस्थेत एकाच रूममध्ये करण्यात आल्याचा आरोप आहे. तथापि, मध्य प्रदेशात धार येथे नुकत्याच झालेल्या भरतीदरम्यानही उमेदवारांच्या छातीवर जात लिहिण्याचे प्रकरण घडले होते.

 

217 नवीन कॉन्स्टेबल्सची झाली भरती
- भिंड पोलिसांत 217 महिला-पुरुष कॉन्स्टेबल्सची भरती झाली. त्यांचे वेगवेगळ्या टप्प्यात जिल्हा रुग्णालयात मेडिकल चेकअप केले जात आहे. बुधवारी सकाळी 39 उमेदवारांची मेडिकल टेस्ट करण्यात आली. यात 18 तरुणी आणि 21 तरुण होते.
- महिलांच्या तपासणीदरम्यान तेथे महिला डॉक्टर अथवा नर्स हजर नव्हती.


सिव्हिल सर्जनने दिले चौकशीचे आदेश
- आरोपांवर जिल्हा रुग्णालयाचे अधिकारी उत्तर देण्याचे टाळत आहेत. दुसरीकडे, सिव्हिल सर्जन अजित मिश्रा यांनी प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, या प्रकरणाचे आणखी फोटोज...

बातम्या आणखी आहेत...