आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • भय्यू महाराजाच्या दुसऱ्या लग्नामुळे नाराज होती कन्या, म्हणून राहत होती वडिलांपासून दूर Divyamarathi Exclusive Report Of Bhayyu Maharaj Suicide Case

भय्यू महाराजांच्या दुसऱ्या लग्नामुळे नाराज होती कन्या, यामुळे राहत होती वडिलांपासून दूर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
- 50 लाखांच्या प्रॉपर्टीवरूनही विवाद समोर येत आहे, यामुळेही ते तणावात होते.
- तणावमुक्तीसाठी वडिलोपार्जित घरी जाणार होते, तेथेच दीर्घ काळा थांबण्याचा त्यांचा विचार होता.

 

इंदूर - भय्यू महाराजांच्या पार्थिवावर बुधवारी अंत्यसंस्कार पार पडले. दुसरीकडे, आत्महत्येप्रकरणी पोलिस अनेक बाबींवर तपास करत आहेत. भय्यू महाराज अनेक दिवसांपासून कौटुंबिक तणावात होते. पत्नी आयुषीशी त्यांचे वाद होत असल्याच्या मुद्द्यावर पोलिस चौकशी करत आहेत. सूत्रांनुसार, दुसऱ्या लग्नानंतर त्यांच्या पत्नीचा हस्तक्षेप वाढला होता. यावरून अनेकवेळा त्यांच्यात कुरबुरी झाली होती. भय्यू महाराजांचे पहिल्या पत्नीपासून झालेली मुलगी कुहूवर निरातिशय प्रेम होते. दुसरीकडे लग्नानंतर मात्र मुलीने त्यांना दूर केले होते. दुसऱ्या पत्नीपासून त्यांना 3 महिन्यांची मुलगी आहे. कुहू पुण्यातून मंगळवारीच इंदूरला आली होती. मुलीची रूम अस्ताव्यस्त पाहून त्यांचा पत्नीशी वाद झाला होता. नोकरांनाही त्यांनी यावरून रागावले होते. काही महिला अनुयायांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, ते 50 लाखांचा प्रॉपर्टी विवाद आणि कौटुंबिक कलहामुळे तणावात होते. 

भय्यू महाराजांचे सूर्योदय आश्रम नावाने एक एनजीओ आहे, जे नर्मदा नदीच्या आसपास विकासकामे करते. अनेक गावांत त्यांच्या एनजीओने एक हजारपेक्षा जास्त तलाव आणि पाण्याच्या टाक्यांची व्यवस्था केली होती. सूत्रांनुसार, मुख्यमंत्र्यांद्वारे नर्मदा किनारी 6 कोटींहून जास्त वृक्ष लागवडीमध्ये मोठा घोटाळा झाला आहे. याची माहिती-पुरावे एनजीओने भय्यू महाराजांपर्यंत पोहोचवले होते. यावर त्यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चाही केली होती. यावरूनही ते तणावात होते, असे सांगितले जाते.

 

लग्नसोहळ्याला आली नव्हती कुहू
पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत हे समोर आले आहे की, भय्यू महाराजांच्या दुसऱ्या लग्नाची कुहूला माहिती नव्हती. ती लग्नात आली नव्हती. नंतर कळल्यावर कुहून घरात भांडण केले आणि पूजेचा दिवाही फेकून दिला. महाराजांनी पत्नी आणि मुलीची समजूत घातली. घराच्या रंगरंगोटीदरम्यान कुहूची आई म्हणजेच भय्यू महाराजांच्या पहिल्या पत्नी माधवी यांचा फोटो हटवण्यात आला होता. तेव्हाही घरात मोठा वाद झाला होता.

 

दर तासाला फोनवर दोघांत व्हायचे बोलणे
घटनेनंतर डॉ. आयुषी आक्रोश करत रुग्णालयात पोहोचल्या. त्यांनी लोकांना विचारले, गुरुजी कुठे आहेत, त्यांना कुठे ठेवले आहे. चेहऱ्यावर तणाव होता, पण डोळ्यात अश्रू नव्हते. त्यांना आयसीयूमध्ये असल्याचे सांगण्यात आले. आयुषी लगेच धावत तिकडे गेल्या. त्यांची अशी अवस्था पाहून तेथे उपस्थित नातेवाईक, शिष्यांनाही अश्रू अनावर झाले. डॉ. आयुषी हॉस्पिटलमध्ये रडत, किंचाळत म्हणत होत्या, एकही गुरुजी मला म्हणाले नाहीत की, ते तणावात आहेत. मला गुरुजींची एवढी सवय झाली होती की, आम्ही दोघे एकमेकांशिवाय राहू शकत नव्हतो. दर तासाला मी त्यांना फोन लावायचे किंवा ते मला फोन लावत होते. आम्ही काही मिनिटे बोलत असू. आता मला फोन कोण लावणार? सर्व जण गुरुजींना भेटायला घरी यायचे. आता आमच्या घरी कोण येईल? दोन तास झाले. त्यांचा फोनच नाही आला. सारखे मला वाटत होते की, आता त्यांचा फोन येईलच.

 

भय्यू महाराजांच्या अखेरच्या आठवणी...

सर्वात मोठी घोषणा... -भय्यू महाराजांनी दत्त जयंतीनिमित्त पर्यावरण महायज्ञ केला होता. यात घोषणा केली होती की, देशभरातील अशी मुले जी अनाथ आहेत, अशा माता ज्यांच्यावर अन्याय झाला आणि मजबुरीने अपत्याला जन्म दिला, त्या सर्वांना मी माझे नाव देतो. कोणत्याही संस्थेत वडिलांच्या नावाची गरज असेल, तर अशी मुले माझे नाव वापरू शकतात.

 

अखेरचा कार्यक्रम... -नुकतेच जातीवरून देशात काही ठिकाणी हिंसा झाल्यानंतर ते संपवण्यासाठी हमसाज नामक आयोजन केले होते. सर्व धर्मांच्या गुरूंना एका मंचावर भय्यू महाराजांनी आणले होते. ते कार्यक्रमाचे संरक्षक होते. यात किन्नर आखाड्याचे महामंडलेश्वर लक्ष्मीनारायण त्रिपाठी, साध्वी प्रज्ञा भारती याही आल्या होत्या.

 

अखेरची भेट... आश्रमात काही खास व्यक्तींशी 
रविवारी दुपारी दीड वाजता आश्रमात पोहोचले. गार्डला भेटले. थेट आपल्या गादीवर बसले. रात्रीपर्यंत बसून राहिले. यादरम्यान काही खास व्यक्तींनाच भेटले. आश्रमातील काही लोक म्हणाले- त्या दिवशी त्यांची भावमुद्रा काही वेगळीच होती.

 

दाखवले औदार्य... हल्ला करणाऱ्यांना केले माफ
गतवर्षी पुण्याहून इंदूरला जात असताना त्यांच्यावर हल्लाही झाला होता. पोलिसांनी आरोपींची धरपकड केली होती, परंतु भय्यू महाराजांनी त्यांना माफ केले होते.


राजकारणात दखल... बड्या नेत्यांच्या गाठीभेटी
दत्त जयंती आणि गुरुपौर्णिमा हे दोन असे आयोजन होते, ज्यात देशभरातील नेते सहभागी व्हायचे. महाराष्ट्रातील भाजप, काँग्रेस नेत्यांमध्ये त्यांचा चांगला प्रभाव होता. माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील, भारतरत्न लता मंगेशकर, देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, सुशीलकुमार शिंदे त्यांच्या खूप जवळचे होते.

 

1.45 वाजता मृत्यूची खात्री, 1.57 वाजता शेवटचे ट्विट
भय्यू महाराजांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून मंगळवार दुपारी 1.57 वाजता शेवटचे ट्विट झाले. यात मासिक शिवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या. 1.46 मिनिटांनी गोपीनाथ कविराज यांच्या पुण्यतिथीवर श्रद्धांजली अर्पण केली. 12.13 वाजता नरेंद्रसिंह तोमर यांना जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या. ट्विटर अकाउंट स्टाफकडून संचालित केले जाते, परंतु भय्यू महाराजांनी स्वत: हे ट्विट केले. 

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, संबंधित आणखी फोटोज... 

बातम्या आणखी आहेत...