आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • मुलाच्या निधनानंतर सासू सासऱ्याने सुनेचे लावले दुसरे लग्न; सून म्हणाली देवाने असे सासू सासरे प्रत्येकाला द्यावे Family Arrange Widow Daughter In Law Second Marriage In Jaora

मुलाच्या निधनानंतर सासू-सासऱ्याने सुनेचे लावले दुसरे लग्न; सून म्हणाली- देवाने असे सासू-सासरे प्रत्येकाला द्यावे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जावरा (मध्य प्रदेश) - येथील एका कुटुंबाने आपल्या मुलाच्या निधनानंतर सुनेचा मुलीसारखा सांभाळ करून तिचे दुसरे लग्न लावून दिले. येथील वीज मंडळातील निवृत्त कर्मचारी तुलसीराम नागरू यांचा छोटा मुलगा राजेशचे 2010 मध्ये जयासोबत लग्न झाले होते. 2 वर्षांपूर्वी राजेशचा हार्टअटॅकने मृत्यू झाला. जया कुटुंबासोबत राहूनही एकटी पडली होती. तिला अपत्य नव्हते. कुटुंबाने मग जयाचे दुसरे लग्न लावण्याचा विचार केला. जयाचे वडील सतीश आणि आजोबा मांगीलाल यांच्याशी चर्चा केली. ते म्हणाले जया तुमचीच मुलगी आहे, तुम्ही जो निर्णय घ्याल तो आम्हाला मंजूर असेल.

 

मुकेशच्या पहिल्या पत्नीचा झाला आहे मृत्यू
जयाचे आजोबा राजेश मंडवार यांच्याकडे लग्नाची बोलणी सुरू झाली आणि या स्थळाबाबत तुलसीराम यांना सांगण्यात आले. ते मुलाची भेट घेण्यासाठी त्याच्या गावी गेले. तेथे कळले की, मुकेश विवाहित आहे आणि त्याच्या पहिल्या पत्नीचे निधन झालेले आहे. मुकेशला 13 वर्षांची मुलगी आणि 6 वर्षांचा मुलगा आहे. दोन्ही कुटुंबांनी राजीखुशीने जया आणि मुकेशचे स्थळ पक्के केले. शनिवारी जया आणि मुकेशचे लग्न झाले. सासरच्या मंडळींनी सुनेची आपल्या मुलीप्रमाणे नव्या सासरी पाठवणी केली.

 

शिकण्याची इच्छा होती, मग सासरच्यांनीच ग्रॅज्युएशनपर्यंत शिकवले
जया म्हणाल्या, लग्नाआधी त्यांनी 12वीपर्यंत शिक्षण घेतले होते. मला आणखी शिकण्याची इच्छा होती. ती सासऱ्यांनीच पूर्ण केली. कॉलेजमध्ये माझे अॅडमिशन केले आणि 3 वर्षे शिक्षणानंतर मला ग्रॅजुएशनची डिग्री मिळाली. सध्या मी स्वत:ला व्यग्र ठेवण्यासाठी खासगी शाळेत मुलांना शिकवत होते. मी आयुष्यभर माझ्या सासरच्या मंडळींची ऋणी राहीन. देवाने यांच्यासारखे सासू-सासरे प्रत्येकाला द्यावे.

 

आपसात चर्चा, मग घेतला लग्नाचा निर्णय
जया म्हणाल्या, माझे सासू-सासरे माझ्या भविष्याबाबत चिंतित होते. त्यासाठी त्यांनी माझ्यासमोर दुसऱ्या लग्नाचा प्रस्ताव ठेवला. मीही विचार करून संमती दिली. त्यांनी माझा मुलीसारखा सांभाळ केला आणि दु:ख दूर व्हावे म्हणून माझे दुसरे लग्न लावले. दुसरीकडे, मुकेश म्हणाले की, आम्ही दोघेही एकमेकांची परिस्थिती समजून घेतो. कुटुंबीयांचीही इच्छा होती की, आयुष्यात आपण पुढे जावे. आम्ही आपसात बोलून लग्नाचा निर्णय घेतला.   

बातम्या आणखी आहेत...