आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • लग्नाला नकार दिल्याने तरुणीवर शेजाऱ्याने झाडल्या गोळ्या Firing On Girl For Refuses Marriage

लग्नाला नकार दिल्याने तरुणीवर शेजाऱ्याने झाडल्या गोळ्या, पोट-हातात लागल्या 2 गोळ्या, प्रकृती चिंताजनक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्वाल्हेर - लग्नाला नकार दिल्याने आयएएसची तयारी करत असलेल्या विद्यार्थिनीवर शेजारच्या तरुणाने फायरिंग केली. घटना रविवारी हजिरा परिसरातील वैष्णोपुरममध्ये घडली. विद्यार्थिनीला हात आणि पोटात गोळी लागली. तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले आहे. पोलिसांनी हल्लेखोराविरुद्ध एफआयआर दाखल केली आहे. दुसरीकडे आरोपीचे कुटुंबीय म्हणाले- आमच्या मुलाला खोट्या आरोपात फसवले जात आहे. त्यांनी काही सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांना सोपवले आहेत.

> वैष्णोपुरममधील रहिवासी बीएस्सी ग्रॅज्युएट पूजा (21) निरंजनसिंह राजावत आयएएसची तयारी करते. रविवारी सकाळी पूजा आपला भाऊ राम राजावतसोबत औषधे खरेदी करण्यासाठी जात होती. ती जेव्हा घराबाहेर उभी होती, तेवढ्यात तिचा भाऊ घरात हेल्मेट घेण्यासाठी गेला. यादरम्यान शेजारच्या नितीन लालजी भदौरिया याने कट्ट्यातून फायरिंग सुरू केली. एक गोळी पूजाच्या डाव्या हाताला आणि एक पोटाच्या खालच्या भागात लागली. रक्तबंबाळ होऊन रस्त्यावर पडलेल्या पूजाला कुटुंबीयांनी त्वरित रुग्णालयात दाखल केले.

 

भीतीमुळे घरातून निघणे केले बंद
> माझे स्वप्न आयएएस बनण्याचे आहे. मी तयारीही करत आहे. शेजारी राहणारा नितीन भदौरिया कोचिंगवरून येता-जाता वाट अडवायचा. अनेक वेळा त्याने छेडछाड केली आहे. माझ्या घरच्यांनी कोचिंग बंद केली होती. घरातून निघणे बंद केले होते. यानंतरही तो त्रास देऊ लागला होता. प्रत्येक वेळी भीतीत जगत होते. घरावर दगडफेक केली. सकाळपासून माझ्या डोके आणि शरीर दुखत होते. भावाला सांगितल्यावर तो मला दवाखान्यात घेऊन जात होता. त्याने बाइक काढली, मी जवळच उभी होते. भाऊ हेल्मेट विसरला. तो आत हेल्मेट घेण्यासाठी गेला तेवढ्यात नितीनने समोरून दोन गोळ्या झाडल्या. गोळी हात आणि पोटात लागली. मी बेशुद्ध झाले. हॉस्पिटलमध्येच शुद्धीवर आले. नितीनमुळे माझे आणि माझ्या घरच्यांचे जगणे अवघड झाले आहे.
- जसे जखमी पूजा राजावतने दैनिक भास्करला सांगितले.

 

दोन दिवसांपूर्वीच झाले होते भांडण, घरवर झाली दगडफेक
>माझ्या बहिणीला नितीन भदौरिया अनेक महिन्यांपासून त्रास देत होता. त्याच्यामुळे घराबाहेर निघणे बंद झाले होते. तरीही तो छतावर धमक्यांचे पत्र लिहून टाकत होता. तो सारखा म्हणायचा की, लग्न केले नाहीस तर जसा त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला, पूर्ण कुटुंबालाही मरावे लागेल. तो आत्महत्या करणार असल्याचेही म्हणायचा. दोन दिवसांपूर्वीच भांडण झाले होते. तेव्हा त्याने आणि त्यासच्या घरच्यांनी दगडफेक केली होती. 
-राम राजावत, पूजाचा भाऊ

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी फोटोज...

बातम्या आणखी आहेत...