आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आईनेच मुलाला त्याच्या मित्रांसोबत करायला लावला गँगरेप, 10 वीतली मुलगी बेशुद्ध पडेपर्यंत तोडले लचके

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
Demo Pic. - Divya Marathi
Demo Pic.

सागर (एमपी) - मंदसौर, सतना, जयपूरच्या नंतर आता सागरमध्ये 10 वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर गँगरेपचे प्रकरण समोर आले आहे. मंगळवारी एका महिलेच्या मदतीने 4 आरोपींनी तिच्यावर पाशवी अत्याचार केले. यात आरोपी महिलेचा मुलगाही सामील आहे.

 

असे आहे संतापजनक प्रकरण

संध्याकाळी एक आरोपी विद्यार्थिनीला शेतात बांधलेल्या एका खोलीच्या घरात घेऊन गेला. यानंतर गँगरेप केला आणि रात्री उशिरा पीडितेला बेशुद्धावस्थेत एका शाळेच्या अंगणात फेकून आरोपी पसार झाले. पीड़ितेला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुरुवातीला पोलिस हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत होते. यामुळे पीडितेवर उपचारांसाठी 12 तासांचा उशीर झाला. महिलेसहित पाचही आरोपींच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. एसपी सत्येंद्र शुक्ल व पोलिस अधिकाऱ्यांनी गावात पोहोचून घटनेची माहिती घेतली.

 

‘12 तासांपर्यंत शेतात ठेवले, संध्याकाळी तोंड झाकून गावात आणले, बेशुद्ध होईपर्यंत माझे लचके तोडले नराधमांनी’

 

- पीड़िता म्हणाली, गावातील ममता अहिरवार मंगळवारी सकाळी 7 वाजता माझ्याजवळ आली आणि म्हणाली की, चल तुला शेतात फिरवून आणते. मी नकार दिल्यावर तिने बळजबरी माझा हात पकडला आणि तिच्या शेतातील घरात घेऊन गेली. मला आत बसायला सांगून म्हणाली- तू थांब, मी येते. बाहेर जाऊन तिने दाराची कडी लावून घेतली. काळी वेळानंतर ममताचा मुलगा हल्ले अहिरवार आणि शेजारी राहणारे त्याचे मित्र गोपाल अहिरवार, राजेश अहिरवार व प्रवेंद्र पटेल दाराची कडी उघडून आत शिरले. त्यांनी आतून दार लावून घेतले. चौघांनी आळीपाळीने अत्याचार केले. राजेश दारूच्या नशेत होता. संध्याकाळी 7 वाजता माझे तोंड झाकून त्यांनी मला गावातील राजेशच्या घरीही नेले. तेथे राजेश आणि हल्ले याने पुन्हा एकदा अत्याचार केले. वेदनांमुळे मी बेशुद्ध होऊ लागले होते. रात्री माझे तोंड कापडाने झाकून चौघांनी मला गावातील शाळेजवळ फेकले. मला शोधत-शोधत माझे आई-वडील तेथे पोहोचले, तेव्हा त्यांनी आरोपींना तेथून पळून जायला मदत केली.

 

सिस्टिमचा निलाजरेपणा: 12 तास उलटूनही उपचार नाही, डॉक्टर म्हणाला- रेप झाल्याचे सांगितलेच नाही
- गँगरेपने पीडित विद्यार्थिनीला एका सार्वजनिक आरोग्य केंद्रात नेऊन 12 तास उलटले तरी उपचार सुरू झाले नव्हते. जेव्हा तिला 108 अॅम्ब्युलेन्सने नेण्यात आले, तेव्हा ओपीडीसाठी नोंदणी करताना अडथळे आणण्यात आले. पैसे जमा केल्यानंतरही नोंदणी करून पावती देण्यात आली नाही. एवढेच नाही, पोलिसही तिचा जबाब नोंदवण्यासाठी पोहोचले नाहीत. नंतर प्रकरण तापल्याचे पाहून सकाळी 10.30 वाजता एसपी सत्येंद्र शुक्ल व तीन पोलिस स्टेशनचे कर्मचारी आरोग्य केंद्रात पोहोचले. यानंतर पीड़ितेला उपचारांसाठी सागर जिल्ह्यात पाठवण्यात आले. तिला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 

डॉक्टर म्हणाले- त्यांनी बलात्कार झाल्याचं सांगितलंच नाही....

- याबाबत जेव्हा सार्वजनिक आरोग्य केंद्राच्या स्टाफ व डॉक्टरांशी बोलणे केले, तेव्हा त्यांचा तर्क होता की, आम्हाला त्या मुलीवर बलात्कार झाल्याचे सांगितलेच गेले नव्हते. याच मुद्द्यावरून स्थानिक लोकप्रतिनिधींनी स्टाफशी वादावादी केली. पीड़ितेची आजी म्हणाली की, रात्रीपासून हॉस्पिटलमध्ये आलो, परंतु त्यांनी ओपीडीची पावतीच बनवली नाही. आम्हालाच विचारले की, तुम्ही पोलिसांत गेला होता का? मी सांगितले, हो पोलिस आले होते. उपचारांसाठी पैसे नव्हते, घरातून मागवून जमा केले. तरीही त्यांनी रात्रभर पावती दिली नाही.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, संबंधित आणखी photos...  

 

बातम्या आणखी आहेत...