आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Harrowing Accounts Of A Woman Facing Sexual Assault And Acid Attacks By Her In Laws

दीर-नणदेने केले इतके अत्याचार, शरमेने बोलूही शकली नाही भावजयी; Letter मध्ये मांडली आपबिती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो

गुना (मध्य प्रदेश) - येथे एका महिलेवर तिच्या दीर आणि नणदेने इतके अत्याचार केले की ती शरमेने कुणाला काहीच सांगू शकली नाही. अत्याचार झाल्याच्या दीड महिन्यानंतर ती जेव्हा माहेरी परतली तेव्हा तिच्या मानेला अॅसिडचे डाग होते. सासरच्या मंडळीकडून होणाऱ्या अत्याचारांचा तिला इतका मोठा मानसिक धक्का बसला की बोलण्यासाठी तिच्या तोंडात शब्द फुटत नव्हते. परंतु, कुठल्याही परिस्थितीत आपल्या बाबांना हा प्रकार सांगण्याचा हेतूने तिने एक पत्र लिहून ठेवले. याच पत्रात तिने दीर आणि नणदेकडून होणाऱ्या अत्याचारावर आपली आपबिती मांडली. आपल्या मुलीवर होत असलेले अत्याचार वाचून वडिलांचे रक्त खवळले. त्यांनी थेट पोलिस स्टेशन गाठून यासंदर्भातील तक्रार केली. यानंतर पोलिसांनी तिच्या सासरच्या मंडळीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 


असे आहे प्रकरण...
गुना येथे राहणाऱ्या तरुणीचा 2017 मध्ये कुंभराज येथील एका व्यक्तीशी विवाह झाला होता. लग्नानंतर काही दिवस सर्व काही सुरळीत सुरू होते. हळू-हळू सासरच्या मंडळींनी तिचा मानसिक छळ करण्यास सुरुवात केली. याच दरम्यान दीराने भांडणात तिच्या खोलीत घुसून बलात्कार केला. तिने रडता-रडता हा प्रकार आपल्या नणदेला सांगितला. तेव्हा नणदेला आपल्या भावाला काही म्हणणे सोडून पीडितेलाच शांत राहण्यासाठी धमकावले. याच मुद्द्यावरून दोघींमध्ये वाद झाला आणि नणदेने तिच्यावर अॅसिड फेकले. पीडितेची मान अॅसिडमुळे भाजली. यानंतरही त्या नणदेने तोंड उघडल्यास तुझ्या लहान भावाला जिवे मारू अशी धमकी दिली. या प्रकरणी दीर, नणद आणि सासरच्या मंडळीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


दीड महिन्यानंतर सांगितली आपबिती
अॅसिड हल्ल्यात तिची मान जळाली होती. विशेष म्हणजे, आपल्या मुलीच्या मानेवर जखम झाल्याचे पाहून त्यांनी सासरवाडी देखील गाठली. परंतु, सासरच्या लोकांनी स्वयंपाक घरात ती जखमी झाल्याचे स्पष्टीकरण दिले. आई-वडिलांनी तिला उपचारासाठी माहेरी आणले. तरीही तिने आपल्या आई-वडिलांना काहीच सांगितले नाही. एवढा गलिच्छ प्रकार आपल्या पालकांना सांगावा तरी कसा असा प्रश्न तिला पडला होता. तसेच मानसिक धक्क्याने ती शांत झाली होती. ती पुन्हा सासरवाडीत परतली आणि पुन्हा असेच अत्याचार सुरू झाले. अखेर तिने आपल्या वडिलांना पत्र लिहिले आणि पत्रातूनच संपूर्ण प्रकरणाचा खुलासा केला. 


मानसिक धक्क्याने डिप्रेशनमध्ये गेली महिला
सासरच्या मंडळीविरोधात गुन्हा दाखल करून आई-वडिलांनी तिला माहेरी आणले आणि रुग्णालयात उपचार सुरू केला. गेल्या दीड महिन्यांपासून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे, तिच्या जखमा भरल्या तरीही ती मानसिक धक्क्यातून अजुनही बाहेर आलेली नाही. तिला आपल्यावर झालेला अत्याचार वारंवार आठवतो आणि नेहमीच ती रुग्णालयात हंबरडा फोडते. ती डिप्रेशनमध्ये गेली आहे.

बातम्या आणखी आहेत...