आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • प्रेयसीने लग्नाला दिला नकार, म्हणून संतप्त प्रियकराने जाळल्या 5 लाखांच्या नोटा Heart Broken Cashier Set Fire In 5 Lakhs Rupees Notes In MP

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रेयसीने लग्नाला दिला नकार, म्हणून कॅशिअरने जाळल्या 5 लाखांच्या नोटा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कॅशिअरने 5 लाख रुपयांच्या नोटा जाळल्या. - Divya Marathi
कॅशिअरने 5 लाख रुपयांच्या नोटा जाळल्या.

सिहोर/(एमपी) - खासगी फायनान्स कंपनीच्या कॅशिअरने पावणे 7 लाख रुपयांचा अपहार केल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर पोलिसांनी आरोपी कॅशिअर जितेंद्र गोयल याला अटक केली आहे.

 

असे आहे प्रकरण

सूत्रांनुसार, कॅशियर ही रक्कम घेऊन आपल्या प्रेयसीकडे पोहोचला होता, परंतु प्रेयसीने त्याला लग्नाला नकार दिल्यानंतर, कॅशिअरने त्या रकमेपैकी 5 लाख रुपयांच्या नोटांना आग लावली.

- पोलिसांनी आरोपीकडून 46 हजार रुपये रोख आणि 1 लाख 28 हजार रुपये लॉकरमधून हस्तगत केले आहेत.
- नसरुल्लागंज पोलिसांनी सांगितले की, तहसील मुख्यालयाजवळील स्पंदना स्फूर्ति फायनान्स कंपनीत खासगी फायनान्स केला जातो. येथे जितेंद्र गोयल कॅशियर म्हणून काम पाहत होता.
- कॅशियरकडेच येथील किल्लीही असायची. सूत्रांनुसार, 17-18 एप्रिलच्या रात्री कॅशिअर जितेंद्र कंपनीच्या तिजोरीतून 6 लाख 74 हजार रुपये काढून गायब झाला.
- कंपनीच्या मॅनेजरने सूचना दिल्यानंतर नसरुल्लागंज पोलिसांनी कॅशियर जितेंद्रविरुद्ध अपहाराचा गुन्हा दाखल करून प्रकरणाची चौकशी सुरू केली.

 

प्रेयसीला पैसे दाखवण्यासाठी घेऊन जायचा गावी
- सूचनेच्या आधारे पोलिसांचे पथक कन्नौदच्या बेरावल गावात पोहोचले. येथून कॅशिअरला अटक करून त्याची चौकशी करण्यात आली.
- प्रेयसीने त्याच्याशी लग्नाला होकार द्यावा म्हणून कॅशिअर ही रक्कम आपल्या प्रेयसीला दाखवण्यासाठी गावी गेला होता.
- परंतु त्याच्या प्रेयसीचा विवाह दुसऱ्या ठिकाणी निश्चित झाल्याने तिने लग्नाला नकार दिला. 
- यामुळे चिडून जाऊन कॅशिअरने त्याच्याजवळील 5 लाख रुपयांना आग लावली. आग लावलेल्या रकमेत 2 हजार, 500, 200 आणि 100 रुपयांच्या नोटा होत्या.
- त्याच्याकडून 46 हजार रुपयेही हस्तगत करण्यात आले. सोबतच पंचनामा करून अर्धवट जळालेल्या नोटाही जप्त करण्यात आल्या. यानंतर पोलिसांनी कॅशियर जितेंद्रच्या लॉकरमधून 1 लाख 28 हजार रुपयेही जप्त केले.
- पोलिसांनी सांगितले की, आरोपी स्वत:ही आत्महत्या करणार होता, परंतु त्याआधीच त्याला अटक करण्यात आली.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, या प्रकरणाचे आणखी फोटोज... 

बातम्या आणखी आहेत...