Home | National | Madhya Pradesh | Hit-And-Run Driver Kills Man In Bhopal

Hit & Run ड्रायव्हरला आली डुलकी, फुटपाथवरील दोघांना चिरडले, एक ठार

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jun 23, 2018, 05:10 PM IST

गाडी आणि शटरमध्ये तरुण अडकल्याने कार थांबली, अखेर हा मृतदेह ओढून काढावा लागला.

 • Hit-And-Run Driver Kills Man In Bhopal

  भोपाळ - भारत टॉकीज ब्रिजच्या खाली शुक्रवारी पहाटे तीन वाजता वेगवान इनोव्हा कारने फुटपाथवर झोपणाऱ्या दोन तरुणांना चिरडले. त्यापैकी एकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंजतोय. अपघातानंतर ड्रायव्हर पळून गेला. पण पोलिसांनी त्याला शुक्रवारी संध्याकाळी ताब्यात घेतले.


  ड्रायव्हरला आली डुलकी..
  पोलिसांनी सांगितले की, इनोव्हा कारचा ड्रायव्हर अशोका गार्डनला येत होता. ब्रिजखाली अचानक त्याला डुलकी लागली आणि गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ती उजवीकडे वळाली. ड्रायव्हरने गाडी सांभाळण्याच्या आतच ही गाडी नवीन अजमेरा यांच्या अरिहंत ट्रेडर्सच्या शटरला जाऊन धडकली. त्या गाडीचा वेग एवढा जास्त होता की,गाडी 11 दुकानांच्या शटरवर घासत पुढे गेली.


  गड्ड्यातून पाच फूट उंच उडाली कार
  रसत्यातील एका खड्ड्यामुळे गाडी एवढी उंच उडाली की, पाच फूट उंचीवर लावलेले एअर कंडिशनर तुटले. त्यानंतरही गाडी थांबली नाही. पहिल्या धडकेनंतर गाडीने सुमारे 100 फूट मीटर अंतरावर गौतम ट्रेडर्ससमोर झोपलेल्या दोन तरुणांना चिरडले. त्यापैकी एकाचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरा गंभीर आहे.


  टॅक्टरने ओढून काढला मृतदेह
  चिरडलेल्या तरुणाला कारने फरफटत काही अंतरावर नेले. पण तरुणाचा मृतदेह गाडीच्या बंपर आणि दुकानाच्या शटरमध्ये अडकला. पोलिसांना ट्रॅक्टरच्या मदतीने इनोव्हा ओढून हा मृतदेह काढावा लागला.

Trending