आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • भय्यू महाराजांचे दुसरे लग्न बहिणीने ब्लॅकमेल करून लावले होते How Bhaiyyu Maharaj Second Marriage Was Fixed Which Was Reason For Suicide

भय्यू महाराजांचे दुसरे लग्न बहिणीने ब्लॅकमेल करून लावले होते, असा दिला होता डॉ. आयुषींनी होकार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंदूर - कौटुंबिक कलहामुळे त्रस्त होऊन मध्य प्रदेशचे गृहस्थ संत भय्यू महाराजांनी कथितरीत्या स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. पोलिसांनी त्यांच्या आश्रमातून पिस्तूल आणि एक सुसाइड नोट हस्तगत केली, ज्यात त्यांनी तणावामुळे हे पाऊल उचलत असल्याचे लिहिले होते. तथापि, असे म्हटले जात आहे की, ते कन्या कुहू आणि दुसऱ्या पत्नीतील संपत्तीच्या वादामुळे तणावात होते. लग्नाच्या एका महिन्यानंतर दिलेल्या एका इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी लग्न करण्याची पूर्ण कहाणी सांगितली होती. Divyamarathi.Com त्याच मुलाखतीचे अंश आपल्या वाचकांना सांगत आहे. 

 

सोशल वर्क आणि आई-कन्येच्या जबाबदारीत गोंधळले होते भय्यू महाराज
- दुसरे लग्न करण्यामागचे काय होते, या प्रश्नावर ते म्हणाले होते, "माझ्या पत्नीचे जेव्हा निधन झाले, तेव्हा माझ्या मुलीचे वय खूप कमी होते. सोबतच माझी आई विसराळूपणाचा आजाराने ग्रस्त होती. यादरम्यान माझ्या वडिलांचे निधन झाले आणि मग माझा अॅक्सिडेंट. मी समाज कार्य आणि कौटुंबिक जबाबदार योग्यरीत्या सांभाळू शकत नव्हतो. यामुळेच मला हा निर्णय घ्यावा लागला."
- तथापि, भय्यू महाराजांच्या पहिली पत्नी माधवीचे निधन सन नोव्हेंबर 2015 मध्ये हार्ट अटॅकमुळे झाले होते. 
- त्या वेळी त्यांची आई एवढ्या आजारी होत्या की, त्यांना स्वत:च्या हातांनी जेवणही करता येत नव्हते आणि कपडेही बदलता येत नव्हते. दुसरीकडे, त्यांची कन्याही खूप लहान होती.

 

बहिणीने केले होते ब्लॅकमेल
- आपल्या भावाची तारेवरची अशी कसरत पाहून भय्यूजी महाराजांच्या मोठ्या बहीण मधुमती खूप परेशान होत्या.
- त्यांनी इंटरव्ह्यूमध्ये सांगितले होते, "भय्या खूप परेशान राहायचे. 2-2 दिवस जेवणही करू शकत नव्हते. आईही सीरियस होती आणि माझी भाचीही लहान होती. मला वाटायचे की, मी जाण्याआधी माझ्या भावाचे घर पुन्हा एकदा सुरळीत व्हावे. यामुळेच मी त्यांच्यावर लग्नासाठी दबाव टाकला."
- लग्नासाठी कसे तयार केले, यावर मधुमती म्हणाल्या होत्या, "मी भावाला ब्लॅकमेल केले होते. मी म्हणाले होते की, जोपर्यंत तू लग्नासाठी हो म्हणणार नाहीस, मी जेवण करणार नाही. मी दोन दिवसांपर्यंत काहीही खाल्ले नव्हते. माझ्या हट्टापुढे त्यांना माघार घ्यावी लागली. त्यांनी लग्नासाठी होकार भरला."

 

लग्नासाठी कशा तयार झाल्या डॉ. आयुषी?
- डॉ. आयुषी म्हणाल्या होत्या, "मी सोशल मीडिया मार्केटिंग प्रोजेक्ट अंतर्गत त्यांच्या संपर्कात आले होते. माझी त्यांच्याशी खूप कमी वेळा भेट व्हायची. मी त्यांच्या घरी दररोज जायचे आणि त्यांच्या आईजवळ बसायचे. त्यांच्या बहिणीशीही चांगली मैत्री झाली होती." 
- "एक दिवस अचानक मधुमती अक्का मला म्हणाल्या की, मी माझ्या भावाचे लग्न तुमच्याशी लावू इच्छिते. तुम्ही मला पसंत आहात. त्यांच्या आईनेही मला हीच बाब सांगितली. मी म्हणाले होते, विचार करून सांगेन. ही बाब फक्त आमच्या तिघांमध्येच होती, भय्यूजींना काहीही माहिती नव्हते."
- यानंतर डॉ. आयुषी यांनी लग्नासाठी होकार भरला होता. 30 एप्रिल 2017 रोजी दोघांचे लग्न झाले.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी Photos...  

बातम्या आणखी आहेत...