आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
भोपाळ - मध्यप्रदेशची राजधानी भोपाळमध्ये गर्भवती पत्नीने स्वतःच्या हाताने पतीचा खून केला. पत्नीने शनिवारी रात्री बेडरुममध्ये झोपलेल्या पतीवर धारदार शस्त्राने सात वार केले. अतिशय निर्दयपणे तिने पतीच्या गळ्यावर आणि शरीरावर वार केले. मंगळवारी पत्नीने स्वतः पोलिसांसमोर गुन्ह्याची कबूली दिली. ती म्हणाली, 'माझ्या इच्छेविरुद्ध माझे लग्न लावून देण्यात आले होते. पतीला त्वचारोग होता. त्याची मला किळस येत होती. तो मला बिलकूल आवडत नव्हता. म्हणूनच त्याला ठार मारले.'
पतीला मारून घरता हसत-खेळत होती पत्नी
- मध्यप्रदेशच्या राजधानी पासून जवळच असलेल्या ईटखेडी गावात हे हत्याकांड झाले. नीरज मेवाडा याचा मृतदेह त्याच्याच बेडरुममध्ये रक्त्याच्या थारोळ्यात पडलेला सापडला.
- नीरजची हत्या धारदार शस्त्राने गळा चिरून करण्यात आली होती. पोलिसांनी दोन दिवसात या हत्याकांडाचा गुंता सोडवला आणि नीरजची पत्नी नीतूला अटक केली आहे.
- अशी माहिती आहे, की शनिवारी उशिरा रात्री नीतूने पतीचा खात्मा केला. नीरज गाढ झोपेत असताना नीतूने धारदार शस्त्राने त्याच्या गळ्यावर आणि शरीरावर वार केले.
- कुटुंबियांनी सांगितले की नीरज आणि नीतू यांच्यासाठी पहिल्या मजल्यावर एक रुम तयार करण्यात आली होती. तिथेच त्याचा मृतदेह सापडला.
- नीतू रविवारी सकाळी रोजच्या प्रमाणे उठली आणि खाली आली. सर्वांसोबत हसत-खेळत काम करु लागली. कुटुंबियांनी नीरज बद्दल विचारले तर तो झोपलेला असल्याचे नीतूने सांगितले.
- नीरजचा भाऊ त्याला झोपेतून उठवण्यासाठी गेला तर तिथे रक्ताच्या थारोळ्यात नीरज पडलेला होता. घटनास्थळीच त्याचा मृत्यू झाला होता. कुटुंबियांना सुरुवातीपासून नीतूवर संशय होता.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, घटनास्थळावरील दृष्य...
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.