आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • पत्नी रात्री दुसऱ्या तरुणाशी फोनवर बोलत होती, चिडलेल्या नवऱ्याने गळा आवळून केली हत्या Husband Murdered His Wife

पत्नी रात्री दुसऱ्या तरुणाशी फोनवर बोलत होती, चिडलेल्या नवऱ्याने गळा आवळून केली हत्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्वाल्हेर - चारित्र्यावर संशय असल्याने एका तरुणाने पत्नीची गळा आवळून हत्या केली. दुसऱ्या दिवशी तो स्वत: पोलिस स्टेशनमध्ये गेला आणि हत्येचा गुन्हा कबूल केला. ही घटना मुरारमध्ये मंगलवारी घडली. घटनेपूर्वी महिला एका युवकाशी फोनवर बराच वेळ बोलत होती, यामुळे आरोपी पती चिडला होता.

 

पत्नीची हत्या करून स्वत: गेला पोलिसांत
इंद्रराज कोली (32) याचे लग्न 9 वर्षांपूर्वी भावनाशी झाले होते. लग्नाच्या काही दिवसांनंतर भावना पतीचे घर सोडून माहेरी गेली होती. यानंतर ती मध्येच काही दिवस येत-जात राहिली. दरम्यान, भावनाला अॅलेक्स नावाची मुलगी झाली, ती आता 5 वर्षांची आहे. काही महिन्यांपूर्वी भावना पुन्हा पतीला सोडून निघून गेली होती. 15 दिवसांपूर्वीच भावनाने इंद्रराजला फोन करून त्याच्यासोबत राहण्याची इच्छा व्यक्त केली. इंद्रराजने अट ठेवली की, माझ्यासोबत राहायचे असेल तर आणखी कुणाशी संपर्क ठेवता येणार नाही. भावनाने अट स्वीकारली आणि इंद्रराजसोबत राहण्यासाठी आली. इंद्रराजने आपले वडिलोपार्जित घर सोडून किरायाने रूम घेतली आणि भावनासोबत राहू लागला. सोमवारी रात्री भावनाने संदीप नावाच्या तरुणाशी फोनवर बातचीत केली. यावरून इंद्रराज आणि भावनामध्ये मोठा वाद झाला. मारहाणीपर्यंत वाद विकोपाला गेला. चिडून इंद्रराजने पत्नी भावनाचा बेल्टने गळा आवळला आणि मुलगी अॅलेक्सला घेऊन आपल्या घरी निघून गेला. मंगळवारी संध्याकाळी 4 वाजता इंद्रराज मुरार पोलिस स्टेशनमध्ये गेला. त्याने पोलिसांना सांगितले की, मी पत्नीची हत्या केली आहे.

 

कुरियर कंपनीत काम करतो इंद्रराज
इंद्रराजने पोलिसांना सांगितले की, मी पत्नीच्या वागण्यामुळे त्रस्त झालो होतो. रात्री ती संदीपशी फोनवर बोलत होती, मी तिला याचा जाब विचारल्यावर तिने भांडण सुरू केले. मग रागाच्या भरात मी तिची हत्या केली.

 

काय म्हणतात पोलिस?
मुरार पोलिस स्टेशनचे टीआय मदन मोहन मालवीय म्हणाले की, महिलेचा गळा आवळून हत्या करण्यात आली आहे, पतीवर हत्येचा संशय आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. पतीला लवकरच अटक केली जाईल.  

बातम्या आणखी आहेत...