आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'त्याने बायको पळवली म्हणून मी त्याचा कुऱ्हाडीने काटा काढला', आरोपी म्हणाला- पत्नी लपूनछपून त्याला भेटायला जायची

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

होशंगाबाद (एमपी) - येथे कलेक्टर बंगल्याजवळ रेशन दुकानदार रमेश परिहार यांची कुऱ्हाडीचे घाव घालून हत्या करणाऱ्या मकरंदसिंह ठाकूर आणि त्याच्या अल्पवयीन मुलाला पोलिसांनी अटक केली आहे. पत्नीचे रमेशशी अवैध संबंध आणि कुटुंब उद्ध्वस्त झाल्याने मकरंद नाराज होता, म्हणूनच त्याने रमेशची निर्घृण हत्या केल्याची कबुली दिली. गुरुवारी पोलिसांसमोर आरोपीने कबूल केले की, रमेशने माझे सर्वस्व असलेली पत्नी फितवली, म्हणून त्याचा काटा काढला. हत्येनंतर पोलिस आपल्यापर्यंत पोहोचू नयेत म्हणून त्याने आपल्या अल्पवयीन मुलाला कटात सामील केले. पोलिसांनी मकरंदला त्याच्या गावातून शोभापूरहून परतताना होशंगाबादच्या रोडवरून, तर मुलाला प्रतापनगरमधील किरायाच्या खोलीतून अटक केली.

 

पत्नी लपूनछपून दररोज जायची प्रियकराला भेटायला
एसपी अरविंद सक्सेना म्हणाले की, मकरंदला त्याची पत्नी आणि मृत रमेशमध्ये अवैध संबंध असल्याचा संशय होता. त्याची पत्नी 4 महिन्यांपासून मकरंद सोडून वेगळीच एकटी राहत होती. यादरम्यान, रमेशचे संगीताकडे येणे-जाणे वाढले होते. पत्नी रमेशला त्याच्या घरी टिफिन देण्यासाठी जात होती. मकरंद या सर्व प्रकारावर नजर ठेवून होता. मंगळवारी पाठलाग करताना कलेक्टर बंगल्याच्या जवळ सुनसान जागा पाहून त्याने रमेशच्या डोक्यात कुऱ्हाडीचे वार केले. यात रमेशचा जागीच मृत्यू झाला.

 

स्वत:सोबत अल्पवयीन मुलालाही बनवले गुन्हेगार...
मकरंद म्हणाला की, पत्नीशी 20 वर्षांपूर्वी लव्ह मॅरेज केले होते. ती शोभापूरची रहिवासी आहे. तिच्या आग्रहावरूनच होशंगाबादमध्ये राहू लागलो. किरायाचा ऑटो चालवून घर चालवत होतो. रमेशच्या मुलीमुळेच त्याची आणि पत्नीची ओळख झाली. पत्नी वेगळी राहू लागल्यावर रमेश तिला पैसे पुरवू लागला होता. पत्नी स्वत:पासून दूर झाल्याच्या रागात त्याने आपल्या अल्पवयीन मुलासोबत मिळून रमेशची हत्या केली.

 

पडक्या घरात सापडली कुऱ्हाड अन् रक्ताळलेले कपडे
मकरंद आपल्या काकाच्या घ्ज्ञरातून त्यांची बाइक बहाण्याने घेऊन गेला. हत्येनंतर दोन्ही बापलेकांनी रक्ताने माखलेले कपडे आणि कुऱ्हाड थैलीत ठेवून एका पडक्या घरात फेकले. नंतर आपल्या काकाची बाइक परत केली. मुलाला प्रताप नगरमध्ये सोडून मकरंद शोभापुरला निघून गेला. होशंगाबादवरून परतताना पोलिसांनी त्याला अटक केली.   

बातम्या आणखी आहेत...